Dombivli मध्ये ऊन-पावसाचा खेळ; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

77
डोंबिवलीत पावसात भिजणारे नागरिक आणि ओले रस्ते
Dombivli मध्ये ऊन-पावसाचा खेळ; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli              उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही आणि घामाच्या धारा निघत असल्याने चातकाप्रमाणे वरूणराजाची प्रतीक्षा करणाऱ्या प्राणीमात्रांनी सोमवारी सायंकाळी पावसाने सुखद धक्का दिला. एकीकडे स्टेशन परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर दुसरीकडे कडकडीत उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील रहिवाशांना पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे डोंबिवलीत ऊन-पाऊस कोल्ह्यांचं लगीन अशी परिस्थिती निर्माण झाली होती. (Dombivli)

त्यातच एकीकडे पावसाच्या थेंबाने सारेच सुखावले असताना दुसरीकडे मात्र पहिल्याचा पावसात वीज पुरवठा खंडित झाला. काही वेळ पावसाच्या सरी पडत असताना लहान मुलांनी या पावसात मनसोक्त आनंद घेतला. पावसाच्या हजेरीने डोंबिवलीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यापासून डोंबिवलीकरांना सोमवारी पावसाच्या दमदार सरींनी दिलासा दिला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील वातावरण आल्हाददायक झाले असून तापमानातही लक्षणीय घट झाली आहे.पावसाच्या पहिल्या सरीबरोबरच रस्ते ओले झाले, झाडे डोलू लागली आणि उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला. अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला, तर काहींनी चहा-पकोड्याची मजा घेतली. (Dombivli)

(हेही वाचा – Jalgaon Murder : पतीने पत्नीची कोयत्याने केली निर्घृण हत्या; नेमकं कारण काय?)

हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-ठाणे पट्ट्यात उष्णता आणि दमट हवामान होते. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे उकाडा कमी होऊन रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Dombivli)

(हेही वाचा – Lucknow Fire News: लखनऊमधील कोचिंग सेंटरला आग, १५ विद्यार्थ्यांचा बळी; बचावासाठी बाथरूममध्ये लपलेल्या विद्यार्थ्यांचा गुदमरून मृत्यू)

रहिवाशांच्या प्रतिक्रिया

२४ तास लाईट गेल्याचा त्रास भोगल्यावर हा पाऊस म्हणजे निसर्गाकडून मिळालेला नजराणाच असल्याच्या भावना एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवाशांनी व्यक्त केल्या. बाजारपेठेतही पावसामुळे लगबग वाढली होती. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.