‘Operation Tiger’चा दणका; ठाकरेंच्या ६ बड्या नेत्यांनी शिवसेनेत ‘एन्ट्री’ घेताच राजकीय भूकंप!

81
Six leaders join Shiv Sena during Operation Tiger event.
‘Operation Tiger’चा दणका; ठाकरेंच्या ६ बड्या नेत्यांनी शिवसेनेत ‘एन्ट्री’ घेताच राजकीय भूकंप!
  • प्रतिनिधी

​Operation Tiger                   महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाला खिंडार पाडत, त्यांच्या ६ महत्त्वाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देत ते पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. (Operation Tiger)

​मुंबईत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर जोरदार टीका केली. “आम्ही कोणतीही गोष्ट अर्धवट करत नाही, आम्ही जे करतो ते फुलप्रूफ असते,” अशा शब्दांत त्यांनी या ‘ऑपरेशन’चा उल्लेख केला. २०२२ मध्ये आपण शिवसेना वाचवण्यासाठी केलेला उठाव आज पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. (Operation Tiger)

(हेही वाचा – Monsoon Session : शेतकरी कर्जमाफीचा ‘खेळखंडोबा’? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल)

​कोण आहेत ते ६ ‘टायगर’?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सहा खासदारांचे स्वागत करताना त्यांना ‘सहा टायगर’ असे संबोधले. यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे आता आपल्याकडे ‘ट्रिपल संजय’ (संजय जाधव, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील) अशी ताकद निर्माण झाली आहे, असे मिश्किल टिप्पणी करत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला. (Operation Tiger)

​‘रील’ नव्हे, हे आहेत ‘रिअल’ स्टार

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवेश केलेल्या प्रत्येक खासदाराचे कौतुक करताना त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केले. संजय दिना पाटील हे कार्यकर्त्यांचे कैवारी असल्याचे सांगत, त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख ‘रिअल स्टार’ असा केला. काही लोक त्यांना ‘रील स्टार’ म्हणून हिणवत होते, पण त्यांनी जनतेसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Operation Tiger)

(हेही वाचा – Dombivli MIDC च्या निवासी विभागाची लोडशेडिंगमधून लवकरच मुक्तता; रहिवाशांच्या एकजुटीला यश)

​विकासाच्या नावावर मोठी खेळी

हे सर्व खासदार केवळ आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. २०२२ च्या बंडावेळी ४० आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असे भविष्य वर्तवले जात होते, पण जनतेने ४० चे ६० आमदार निवडून दिले, याची आठवण करून देत त्यांनी आपण दिलेला शब्द पाळतो, असे स्पष्ट केले. या ६ खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी काळात शिवसेनेचे पारडे अधिक जड झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Operation Tiger)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.