Vidhan Parishad Election Result 2026 : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे सईद खान विजयी

Vidhan Parishad Election Result 2026 : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे सईद खान विजयी

127

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्या पसंतीची सर्वाधिक 242 मते मिळवत विजय संपादन केला. एकूण 465 मतांपैकी खान यांनी निर्णायक आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.(Vidhan Parishad Election Result 2026)

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.(Vidhan Parishad Election Result 2026)

(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इराणने बेल्जियमला ​​गोलशून्य बरोबरीत रोखले )

मतमोजणीअंती महायुतीचे उमेदवार सईद खान यांना 242 मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांना 159 मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर अपक्ष उमेदवार सुशिलभैय्या देशमुख यांना 56 मते मिळाली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.(Vidhan Parishad Election Result 2026)

एकूण मतदानापैकी 8 मते बाद ठरली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने सईद खान यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.(Vidhan Parishad Election Result 2026)

या निकालामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Vidhan Parishad Election Result 2026)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.