नाशिकचा निकाल Girish Mahajan यांच्या जिव्हारी; विश्वासघाताच्या आरोपावर स्पष्टच बोलले ‘ते’ वाक्य!

नाशिकचा निकाल Girish Mahajan यांच्या जिव्हारी; विश्वासघाताच्या आरोपावर स्पष्टच बोलले 'ते' वाक्य!

108
मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी; मंत्री Girish Mahajan यांचे आवाहन
प्रतिनिधी

​विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नाशिक मतदारसंघात झालेला महायुतीचा पराभव सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या पराभवानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीवर थेट विश्वासघाताचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या आरोपांना आता भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन(Girish Mahajan)यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

​नाशिकमधील निकाल महायुतीसाठी अत्यंत धक्कादायक असल्याचे मान्य करत गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीची मते पावणे पाचशेच्या घरात असतानाही दराडे यांचा झालेला पराभव संशोधनाचा विषय आहे. हा पराभव नेमका का झाला, कोणाची मदत मिळाली नाही आणि कुठे गफलत झाली, याची सखोल चौकशी केली जाईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(Girish Mahajan)

(हेही वाचा – ठाकरे गटाला मोठा धक्का: Operation Tiger फत्ते, ६ खासदारांच्या बंडाने राजकीय भूकंप! )

​नरेंद्र दराडे यांनी केलेल्या विश्वासघाताच्या आरोपावर भाष्य करताना गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दराडे पराभवामुळे सध्या वेगळ्या मनस्थितीत आहेत, त्यामुळे ते अशी विधाने करत असावेत. मात्र, माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका घेतलेली नाही. विश्वासघात करणे ही आमची संस्कृती नाही आणि ते आमच्या रक्तातच नाही, असे खडसून सांगत त्यांनी स्वतःवर केलेले आरोप फेटाळून लावले.(Girish Mahajan)

​राज्यातील १७ पैकी १७ जागा जिंकण्याचा महायुतीचा दावा होता, त्यातील नाशिकची जागा वगळता अन्य सर्व ठिकाणी विरोधकांचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या निकालाचे आत्मपरीक्षण करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.(Girish Mahajan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.