Nimbalkar Murder Case : ‘ओमराजेंचा विश्वासघात झाला, पण ठाकरे ठरवतील पुढची दिशा’; अनिल देसाईंचे सूचक विधान

75
अनिल देसाई हत्याकांडावर भाष्य करताना
Nimbalkar Murder Case : 'ओमराजेंचा विश्वासघात झाला, पण ठाकरे ठरवतील पुढची दिशा'; अनिल देसाईंचे सूचक विधान
  • प्रतिनिधी

Nimbalkar Murder Case                 ​पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर सीबीआय विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठाचे खासदार अनिल देसाई यांनी एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. (Nimbalkar Murder Case)

​पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर बोलताना अनिल देसाई म्हणाले, “ही केस ओमराजेंच्या आयुष्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू होती. त्यांना जे आश्वासन देण्यात आले होते, त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आज आलेल्या निकालामुळे हा त्यांचा वैयक्तिक विश्वासघात झाला आहे.” (Nimbalkar Murder Case)

(हेही वाचा – Delhi Airport : दिल्ली विमानतळावर जवळपास ३५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त)

​ओमराजे निंबाळकर सध्या ठाकरे गटापासून दूर असल्याचे चित्र आहे. याबाबत विचारले असता, अनिल देसाई यांनी ओमराजेंच्या ‘पक्षांतर’ किंवा ‘पुनरागमन’च्या शक्यतेवर मोठे भाष्य केले. “ओमराजेंनी पक्ष शिस्तीचा भंग केला आहे, बैठकींना दांडी मारली होती. मात्र, आता हा निकाल लागल्यानंतर जर त्यांना आमच्यासोबत राहण्याचा विचार करायचा असेल, तर त्याबाबत अंतिम निर्णय केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. ते यावर सक्षमपणे निर्णय घेण्यास समर्थ आहेत,” असे देसाई यांनी स्पष्ट केले. (Nimbalkar Murder Case)

​याचवेळी, शिंदे गटाच्या शिवसेनेवर निशाणा साधताना देसाई यांनी खडेबोल सुनावले. “स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना हे विसरून चालणार नाही की, सर्वोच्च न्यायालयात अजूनही आमची केस प्रलंबित आहे. त्यामुळे कोण खरी शिवसेना आणि कोण बंडखोर गट, हे कायदेशीर निकालाअंतीच स्पष्ट होईल,” असे आव्हान त्यांनी दिले. (Nimbalkar Murder Case)

(हेही वाचा – Pakistan पुन्हा रक्ताने माखला! दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा जागीच मृत्यू)

​२० वर्षांच्या संघर्षाअंती पदरी पडलेल्या या निराशेच्या निकालामुळे धाराशिवच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमराजे निंबाळकर आता आपली पुढील राजकीय भूमिका काय घेणार आणि उद्धव ठाकरे त्यांच्या पुनरागमनाबद्दल काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Nimbalkar Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.