NEET UG Re-Exam 2026 : एनटीएचा अजब कारभार! नागपूरच्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेसाठी थेट ‘अबूधाबी’ केंद्र 

74
Students taking the NEET UG exam in a classroom setting.
Students face unexpected exam center issues.

भारतात वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश (NEET) परीक्षेचा गोंधळ संपताना दिसत नाहीये. यापूर्वी पेपर फूटीची घटना घडली होती. मात्र आता वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) पुनर्परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचा (एनटीए) एक मोठा आणि धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. नागपूर (Nagpur NEET Exam Controversy)  येथील रहिवासी असलेल्या अब्दुल्ला नावाच्या एका विद्यार्थ्याला राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने थेट संयुक्त अरब अमिरातीमधील ‘अबूधाबी’ येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. वास्तविक पाहता, या विद्यार्थ्याने परीक्षेचा अर्ज भरताना महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि भंडारा या शहरांना आपली प्राथमिकता दिली होती. असे असतानाही थेट देशाबाहेरचे केंद्र आल्याने विद्यार्थी आणि त्याच्या पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.        (NEET UG Re-Exam 2026)

(हेही वाचा – कतारच्या राजघराण्याचे आलिशान विमान आता Donald Trump यांच्या दिमतीला!)

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ NEET परीक्षेसाठी या विद्यार्थ्याला नागपूरमधील सरस्वती विद्यालय येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, पेपरफुटी प्रकरणानंतर पुनर्परीक्षा जाहीर झाल्यावर त्याने नवीन हॉल तिकीट डाउनलोड केले असता त्यावर संयुक्त अरब अमीरातीतील अबूधाबी (Neet Abu Dhabi Center) इंडियन स्कूल हे परीक्षा केंद्र असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अर्ज भरताना त्याने पहिली पसंती नागपूर, त्यानंतर वर्धा आणि भंडारा या शहरांची निवड केली होती. त्यामुळे प्रवेशपत्रावर परदेशातील केंद्र पाहून त्यांनाही धक्का बसला. विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद तालीब यांनी सांगितले, “आमच्या मुलाला परीक्षा देण्यासाठी परदेशात पाठवणे शक्य नाही. त्याच्याकडे पासपोर्टही नाही आणि आता प्रवासाची तयारी करण्यासाठी वेळही उरलेला नाही.”

NTA कडे तक्रार
एएनआयच्या वृत्तानुसार, कुटुंबीयांनी याप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर NTA ने या प्रकरणाची दखल घेत चूक झाल्याचे मान्य केले असून, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रवेशपत्र जारी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. संबंधित विद्यार्थ्याला नागपूर किंवा जवळच्या शहरात तातडीने परीक्षा केंद्र देण्याची मागणीही त्यांनी केली.

रविवारी होणार पुनर्परीक्षा
दरम्यान, २१ जूनला होणाऱ्या NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी NTA कडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गोपनीय प्रश्नपत्रिका GPS यंत्रणा असलेल्या वाहनांमधून पोलिसांच्या बंदोबस्तात परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.


(हेही वाचा – Rajmata Jijau Women’s Empowerment Scheme : केवळ ‘एक रुपया’ भाड्यात महिला बचत गटांना मिळणार हक्काची जमीन)

परीक्षेची वेळ ? 

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा देखरेख, आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून सुमारे २२.७९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. NTA ने विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १.३० नंतर प्रवेश बंद केला जाणार असून परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.