Ram Mandir, Ayodhya: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरण ! ६० किलो चांदीच्या शिळा, हारांच्या नोंदी गायब

73
Ram Mandir, Ayodhya परिसरातील ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलाचे कारण जाणून घ्या...
Ram Mandir, Ayodhya परिसरातील ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदलाचे कारण जाणून घ्या...

Ram Mandir, Ayodhya:  राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणी एसआयटी तपास सुरू आहे. सध्या एसआयटी मौल्यवान देणग्या, आभूषणे आणि इतर वस्तूंबाबत माहिती घेत आहे. आता मिळत असलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामललाला अर्पण केलेले आणि मंदिराच्या पायामध्ये ठेवण्यात येणारे चांदीचे खडे तपासात एक मोठे कोडे बनले आहेत. तब्बल ६० किलो चांदीच्या शिळा आणि जौनपूरच्या विश्वकर्मा कुटुंबाने दान केलेल्या हाराची नोंद गायब झाली आहे.

तपास पथकाला अद्याप या शिळांची कोणतीही स्पष्ट नोंद किंवा सद्यस्थिती सापडलेली नाही. ज्वेलर्स असोसिएशनचा दावा आहे की, य शिळा पावतीसह ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. एसआयटी पुजारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून अर्पणांचे संकलन, जतन आणि नोंदी ठेवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा तपास करत आहे.

हेही वाचा  – Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू

सहा दिवसात एसआयटीने देणगीच्या नोंदी आणि सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. राम मंदिराच्या पायाभरणीत ठेवण्यासाठी ज्वेलर्स असोसिएशनने दान केलेल्या ६० किलो चांदीच्या शिळांची दगडांची कोणतीही ठोस नोंद तपास पथकाला आढळली नाही. ज्वेलर्स असोसिएशनचा दावा आहे की, त्यांच्याकडे ट्रस्टला दगड सुपूर्द केल्याच्या पावत्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष अनुराग रस्तोगी यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील ज्वेलर्सच्या सहकार्याने तयार केलेले ६० किलो चांदीचे शिळा (दगड) राम मंदिराला दान करण्यात आले होते. ते म्हणतात की, पायाभरणी आणि बांधकाम प्रक्रियेदरम्यान हे दगड दिसले नाहीत आणि त्यानंतर ते गायब झाले.

चार पुजाऱ्यांची चौकशी
हे चांदीचे खडे नेमके कुठे गेले आणि त्यांची सध्याची स्थिती काय आहे, हे एसआयटी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात रामशंकर यादव उर्फ टिन्नू, कृष्णदेव तिवारी आणि रामलल्लाच्या चार पुजाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. दागिने आणि नैवेद्याची देखरेख करणाऱ्या कृष्णदेव तिवारी यांनी हार, चरण पादुका आणि चांदीच्या खड्यांबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.

कोणतीही नोंद एसआयटीला अद्याप सापडलेली नाही
मौल्यवान वस्तू गोळा करणे, जतन करणे आणि त्यांची नोंद ठेवण्याची प्रक्रिया समजून घेण्याचा एसआयटी प्रयत्न करत आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान जौनपूरच्या विश्वकर्मा कुटुंबाने रामललाला अर्पण केलेल्या मौल्यवान हाराची आणि चरण पादुकांची कोणतीही नोंद एसआयटीला अद्याप सापडलेली नाही. तपासादरम्यान, एसआयटीने हार आणि चरण पादुका शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. ६० किलो वजनाच्या चांदीच्या शिळांबाबतही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.