Operation Tiger : खासदारांच्या बंडखोरीने ठाकरे गट हादरला; डॅमेज कंट्रोलसाठी मातोश्रीवरून थेट बोलावणे

Operation Tiger : खासदारांच्या बंडखोरीने ठाकरे गट हादरला; डॅमेज कंट्रोलसाठी मातोश्रीवरून थेट बोलावणे

96
Operation Tiger : खासदारांच्या बंडखोरीने ठाकरे गट हादरला; डॅमेज कंट्रोलसाठी मातोश्रीवरून थेट बोलावणे
Operation Tiger : खासदारांच्या बंडखोरीने ठाकरे गट हादरला; डॅमेज कंट्रोलसाठी मातोश्रीवरून थेट बोलावणे
प्रतिनिधी

​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी अनुपस्थिती राहून ठाकरे गटाला मोठ्या राजकीय धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. पक्षातील सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने मातोश्रीवर चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः परभणी, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा क्षेत्रांतील खासदारांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने उद्धव ठाकरे यांनी तातडीने डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली आहे.(Operation Tiger)

​या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुखांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना शनिवारी थेट ‘मातोश्री’वर बैठकीसाठी पाचारण केले आहे. खासदार पक्षाच्या धोरणांपासून दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी कशी मजबूत राहील आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे स्वतः ही बैठक घेणार आहेत. या बैठकीत खासदारांच्या या संभाव्य बंडावर चर्चा करून स्थानिक नेत्यांना आगामी वाटचालीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे समजते.(Operation Tiger)

(हेही वाचा – Kolhapur : जन्मत:च दोन्ही हात नाहीत, तरी जिद्दीच्या जोरावर बनली मुंबई महापलिकेत अधिकारी; माऊली आडकुरची प्रेरणादायी कहाणी )

​’ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने राजकीय वातावरण तापलेले असतानाच, ठाकरे गटाने आपल्या बालेकिल्ल्यातील जिल्हाप्रमुखांशी संवाद साधून पक्षातील गळती थांबवण्याचा हा एक प्रयत्न मानला जात आहे. ज्या खासदारांनी पक्ष नेतृत्वाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या अनुपस्थितीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जिल्हा पातळीवरील नेत्यांकडे पक्षाची सूत्रे अधिक बळकट करण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.(Operation Tiger)

​शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी होत असलेली ही बैठक ठाकरे गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एका बाजूला शिंदे गटाचे भव्य शक्तिप्रदर्शन सुरू असताना, दुसरीकडे मातोश्रीवरून ठाकरे गटाने सुरू केलेली ही ‘संवाद मोहीम’ आगामी काळात संघटनात्मक फेरबदलांची नांदी ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.(Operation Tiger)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.