नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी ‘मास्टर ट्रेनर’ सज्ज होणार; मंत्री Akash Fundkar यांनी मांडला ‘वर्क प्लॅन’

70
कार्यशाळेत मंत्री आकाश फुंडकर बोलत आहेत.
नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी 'मास्टर ट्रेनर' सज्ज होणार; मंत्री Akash Fundkar यांनी मांडला 'वर्क प्लॅन'
  • प्रतिनिधी

Akash Fundkar             ​औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या समीकरणांना साजेसे नवीन कामगार कायदे प्रभावीपणे राबवण्यासाठी आता कामगार विभागाने कंबर कसली आहे. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी नुकतेच या संहितांच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित आणि अभ्यासू मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली असून, त्यादृष्टीने विशेष प्रशिक्षण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. (Akash Fundkar)

​परळ येथील ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेत आयोजित चार दिवसीय ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या कार्यशाळेत मंत्री फुंडकर बोलत होते. या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केवळ अधिकाऱ्यांना माहिती देणे नसून, त्यांना ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून तयार करणे हे आहे. यामुळे हे अधिकारी भविष्यात विभागातील अन्य कर्मचारी व सहकाऱ्यांनाही या कायद्यांचे सखोल प्रशिक्षण देऊन ज्ञान प्रसाराची साखळी निर्माण करतील. (Akash Fundkar)

(हेही वाचा – Mumbai Crime : ६० लाखांचे दागिने लांबवण्यासाठी रचले अपघाताचे नाटक; डिलिव्हरी बॉयसह दोघे गजाआड)

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, शासन आणि कामगार यांच्यातील सर्वात भक्कम दुवा म्हणजे कामगार विभाग आहे. कामगारांचे संरक्षण, त्यांना मिळणारी सामाजिक सुरक्षा आणि त्याच वेळी उद्योगांना चालना देणे या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील आणि कार्यक्षम राहणे आवश्यक आहे. नवीन कामगार संहितांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्याचा जास्तीत जास्त लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचवावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. (Akash Fundkar)

​या प्रसंगी संस्थेच्या संचालक रोशनी कदम-पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची व्याप्ती आणि त्यातून अपेक्षित असलेले परिणाम स्पष्ट केले. या चार दिवसांच्या सखोल प्रशिक्षणामुळे अधिकारी वर्ग नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्यातील विविध भागांतून आलेले कामगार विभागाचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Akash Fundkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.