Earthquake : चीन आणि जपानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; किंघाई प्रांतात ४० मिनिटांत आले ८ भूकंप

या मालिकेतील सर्वात शक्तिशाली भूकंपाची (Earthquake) तीव्रता ६.३ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होते, जे प्रांतीय राजधानी शियांगपासून सुमारे ५६७ किलोमीटर अंतरावर आहे.

77
Map showing earthquake epicenter in Qinghai, China.
Map indicating the location of the earthquake in Qinghai.

चीनचा वायव्य (नॉर्थ वेस्ट) भाग आणि जपानमध्ये मंगळवारी भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. चीनच्या किंघाई प्रांतात तर अवघ्या ४० मिनिटांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक तब्बल ८ भूकंपांचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. किंघाई प्रांतात मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:४० वाजता भूकंपाचा (Earthquake) पहिला धक्का बसला.

या मालिकेतील सर्वात शक्तिशाली भूकंपाची (Earthquake) तीव्रता ६.३ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होते, जे प्रांतीय राजधानी शियांगपासून सुमारे ५६७ किलोमीटर अंतरावर आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे (Earthquake) एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून भागातील कोळसा खाणींमधून कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने बाधित भागात तात्काळ आणीबाणीचा इशारा जारी केला असून, मदत आणि बचाव कार्यासाठी आपत्कालीन पथके तैनात केली आहेत. घटनास्थळी विशेष वाहने आणि जवानांना रवाना करण्यात आले असून मालमत्ता व जीवितहानीचा अचूक आकडा गोळा करण्याचे काम सुरू आहे.

(हेही वाचा इराण करारावरून अमेरिकन प्रशासनात उभी फूट; ट्रम्प यांच्या टीममध्ये मतभेद, CIA कडून धोक्याचा इशारा)

किंघाई प्रांत का आहे संवेदनशील?

तिबेटच्या पठारावर वसलेला किंघाई प्रांत हा भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. हा प्रदेश भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करीच्या क्षेत्रात येत असल्याने येथे भूकंपाचे प्रमाण अधिक असते. खनिजसंपत्ती, हिमनद्या आणि पर्वतरांगांनी नटलेला हा भाग चीनच्या हवामान आणि जलस्रोतांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.

जपानमध्येही ५.५ तीव्रतेचा भूकंप

चीनपाठोपाठ जपानलाही भूकंपाचा (Earthquake) झटका बसला. जपानच्या इबाराकी प्रांतात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७:४६ वाजता ५.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. जपान हवामान केंद्रानुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ५० किलोमीटर खोलीवर होते. पृथ्वीचा बाहेरील पृष्ठभाग अनेक टेक्टॉनिक प्लेट्समध्ये (Tectonic Plates) विभागलेला आहे. या प्लेट्स सातत्याने अतिशय संथ गतीने हालचाल करत असतात. हालचालींदरम्यान जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर घासतात किंवा आदळतात, तेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत खडकांमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. हा ताण सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर खडक अचानक तुटतात किंवा सरकतात. या प्रक्रियेतून निर्माण झालेली ऊर्जा भूकंपीय लहरींच्या (Seismic Waves) स्वरूपात बाहेर पडते आणि जमीन हादरते. (Earthquake)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.