PM Modi Slovakia Visit : मोदींच्या स्लोव्हाकिया दौऱ्यात 11 महत्त्वाचे करार; भारतासाठी काय लाभ?

भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा

89
PM Modi and Slovak Prime Minister during official visit
फोटो सौजन्य - PM Modi X

PM Modi Slovakia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्याने भारत आणि मध्य युरोपमधील संबंधांना (India-Europe Ties) नवे परिमाण मिळाले आहे. स्लोव्हाकियाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका भारतीय पंतप्रधानाने या देशाला भेट दिल्यामुळे, या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक दौऱ्यामध्ये, भारत आणि स्लोव्हाकिया या दोन्ही देशांकडून द्विपक्षीय संबंधांना, ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ (Comprehensive Partnership) पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, कामगार स्थलांतर आणि दहशतवादविरोधी सहकार्य यांसह विविध क्षेत्रांमध्ये 11 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

स्लोव्हाकिया 1993 मध्ये, स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले, त्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी तिथला अधिकृत दौरा करण्याची ही पहिलीच वेळ होती. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांनी परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि दीर्घकालीन सहकार्याच्या आधारावर संबंध अधिक दृढ करण्याची भूमिका मांडली.

हेही वाचा: NEET पुनर्परीक्षेपूर्वी सरकारची मोठी कारवाई; २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी, जाणून घ्या कारण

11 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी

दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 11 करारांमध्ये – कामगार स्थलांतर, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, संशोधन, ऑडिओ-व्हिज्युअल निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वैज्ञानिक सहकार्य, विद्यार्थी देवाणघेवाण, पर्यटन विकास आणि संरक्षण सहकार्य यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. याशिवाय दहशतवादविरोधी सहकार्यासाठी संयुक्त कार्यगट (Joint Working Group on Counter-Terrorism) स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

या दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी स्वतंत्र ‘लेटर ऑफ इंटेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण तंत्रज्ञान, संशोधन, क्षमता विकास आणि संरक्षण उद्योगांमधील भागीदारी वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपरकॉम्प्युटिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्पांच्या शक्यतांवरही चर्चा झाली.

हेही वाचा: अभिमानास्पद! PM Narendra Modi यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान; जागतिक पातळीवरील पुरस्कारांची संख्या कितीवर?

मोदींना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान भारत-स्लोव्हाकिया मैत्री मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील योगदानासाठी देण्यात आल्याचे स्लोव्हाक प्रशासनाने म्हटले आहे.

स्लोव्हाकिया हा युरोपमधील महत्त्वाचा औद्योगिक आणि तंत्रज्ञान भागीदार मानला जातो. संरक्षण उत्पादन, ऑटोमोबाईल उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि कौशल्याधारित रोजगाराच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्याची संधी आहे. त्यामुळे हा दौरा केवळ राजनैतिक नव्हे तर आर्थिक आणि सामरिक दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.