स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (PM Robert Fico) यांनी सोमवारी १५ जूनला राजधानी ब्रातिस्लावा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)’ (Order of the White Double Cross) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी या सन्मानाबद्दल स्लोव्हाकिया सरकार आणि तेथील जनतेचे आभार मानले. स्लोव्हाकियाचा सर्वोच्च पुरस्कार (Slovakia’s highest award) मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी जगातील इतर ३२ देशांचे सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आले असून, या क्रमात स्लोव्हाकियाच्या समावेशानंतर ही संख्या आता ३३ झाली आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – MSRTC Fare Hike Extended : लालपरीचा प्रवास महागच राहणार; महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढीला मुदतवाढ)
Honoured to receive The Order of the White Double Cross (1st Class) in Bratislava this evening. My gratitude to the people and Government of Slovakia for this honour, which belongs to the 140 crore people of India. I dedicate this award to the enduring friendship between India… pic.twitter.com/FXs96XremQ
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2026
पंतप्रधान मोदींनी एक्सवर केली पोस्ट शेअर
पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री १५ जूनला ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “आज संध्याकाळी ब्रातिस्लावा येथे ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)’ हा पुरस्कार स्वीकारताना मला सन्मानित वाटत आहे. या सन्मानाबद्दल मी स्लोव्हाकियाचे नागरिक आणि सरकार यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पुढे म्हणाले “हा सन्मान भारताच्या १.४ अब्ज नागरिकांचा आहे. मी हा पुरस्कार भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील दृढ मैत्रीला समर्पित करतो.”
सलग १२ वर्षे पंतप्रधान पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, यापूर्वी स्लोव्हाकचे पंतप्रधान रॉबर्ट फिचो यांनी त्यांचे भारतीय समकक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भारताचे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदावर राहिले. त्यामुळे पंतप्रधान असण्याच्या स्थानाला एक राजकीय चमत्कार म्हटले. राजधानी ब्रातिस्लावा येथे पंतप्रधान मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पंतप्रधान फिचो यांनी भारतातील राजकीय स्थिरता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “अशा विविध आणि गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणात सलग १२ वर्षे नेतृत्व टिकवून ठेवणे ही एक असाधारण कामगिरी आहे.”
(हेही वाचा – US Bomber Jet Crash : अमेरिकेत वायू दलाचे बलाढ्य ‘B-52’ बॉम्बर विमान कोसळले; ८ जणांचा होरपळून मृत्यू)
ते पुढे म्हणाले, “तुम्ही ज्या राजकीय स्थिरतेचे प्रतिनिधित्व करता, त्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. ही कामगिरी एका राजकीय चमत्कारासारखी असून ती भारताची लोकशाही शक्ती आणि नेतृत्व क्षमता दर्शवते.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

