Crime News : पित्याचा संताप अनावर, लेकीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, पत्नीलाही… गुन्ह्यामागचे कारण उघड

वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात वडिलांनी तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला केला

90
Blood-stained hammer with a silhouette of a distressed person.
A shocking murder case has emerged from Uttar Pradesh.

Crime News : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात हत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणीची हत्या नेमकी कशामुळे झाली याविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना, पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने सर्वांचीच झोप उडवली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. याच मुद्द्यावरून घरात वारंवार वाद होत व्हायचा, ज्याचे परिवर्तन अखेर एका मोठ्या गुन्ह्यात झाले.

प्रेमकहाणीचा रक्तरंजीत शेवट

घटनेच्या दिवशीही याच कारणावरून घरात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Abhijit Dipake Jaipur : कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण; Video व्हायरल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड देखील जप्त केली आहे.

प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना एक धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या चौकशीत तरुणीच्या हत्येमागे तिच्याच पित्याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या प्रेमसंबंधांमुळे तो नाराज होता आणि त्यातूनच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे.

अवघ्या 19 वर्षांच्या तरुणीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक मतभेद आणि प्रेमसंबंधांवरील वाद इतका टोकाला जाऊ शकतो का, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: Pune crime : सावधान! गॅस बिलच्या नावाखाली नवा सायबर फ्रॉड; पुण्यातील महिलेला साडेआठ लाखांचा गंडा

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.