अमेरिका स्थलांतरितांसाठी असुरक्षित, प्रशासनाचे कडक धोरण; AAPI समुदायात भीतीचे वातावरण

74
अमेरिका स्थलांतरितांसाठी असुरक्षित, प्रशासनाचे कडक धोरण; AAPI समुदायात भीतीचे वातावरण
अमेरिका स्थलांतरितांसाठी असुरक्षित, प्रशासनाचे कडक धोरण; AAPI समुदायात भीतीचे वातावरण

AAPIअमेरिकेत राहणाऱ्या आशियाई आणि पॅसिफिक आयलँडर (एएपीआय) समुदायातील बहुतांशा नागरिकांच्या मते, अमेरिका आता स्थलांतरितांसाठी सुरक्षित राहिलेली नाही. ट्रम्प प्रशासनाच्या अत्यंत कडक आणि आक्रमक इमिग्रेशन धोरणांमुळे या समुदायात मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एएपीआय डेटा आणि AP_NORC यांनी संयुक्त केलेल्या एका नवीन राष्ट्रीय सर्वेक्षणातून हा धक्कादायक खुलासा झाला असून यामुळे अमेरिकेच्या जागतिक प्रतिमेला मोठा तोडा गेल्याचे चित्र आहे.

एबीसीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. या नवीन पोलनुसार, दर १० पैकी ६ आशियाई प्रौढांचे स्पष्ट मत आहे की, अमेरिका पूर्वी स्थलांतरितांसाठी एक महान देश होता. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास ५० टक्के नागरिकांनी सांगितले की, कठोर नियमांमुळे त्यांच्या ओळखीच्या कोणाला तरी गेल्या वर्षभरात इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले आहे. किंवा थेट देशाबाहेर हाकलले आहे. या भीतीपोटी अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी मायदेशी असणाऱ्या आपल्या कुटुंबाला भेटण्याचे प्रवासाचे बेतदेखील रद्द केले आहेत.

हेही वाचा – Konkan Railway चे भाग्य बदलणार! केंद्राकडे पाठवला ४,७०४ कोटींचा प्रस्ताव

प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता कायदेशीर नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड असणाऱ्या नागरिकांनाही दैनंदिन जीवनात कसरत करावी लागत आहे. टेक्सासमधील व्हिएतनामी वंशाचे रहिवासी खोआ ट्रान यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील बातम्या आणि कडक कारवाया पाहता, सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांच्या पत्नीला आता ड्रायव्हिंग लायसन्ससोबत तिचे ग्रीन कार्ड नेहमी सोबत ठेवावे लागते. दक्षिण आशियाई समुदायामध्ये ही भीती अधिक असून अनेक दशकांपासून अमेरिकेत राहणारे लोकही आता स्वतःच्या कायदेशीर अस्तित्वाबद्दल साशंक झाले आहेत.

भारतीय संस्कृतीशी माझे नाते घट्ट
दुसरीकडे, या बदलत्या राजकीय वातावरणामुळे आशियाई नागरिकांचा अमेरिकन ओळखीपेक्षा त्यांच्या मूळ संस्कृतीकडील ओढा अधिक वाढल्याचे सर्वेक्षणात दिसले आहे. साधारण ५४ टक्के नागरिकांना त्यांच्या अमेरिकन नागरिकत्वापेक्षा त्यांच्या मूळ देशाचा वारसा आणि संस्कृती अधिक महत्त्वाची वाटते. मूळ भारतीय वंशाच्या अबीगेल जेयराज यांनी सांगितले की, मी स्वतःची ओळख साऊथ एशियन अमेरिकन अशी करून देते. अमेरिकेत मला मिळालेल्या संधींबद्दल कृतज्ञता असली, तरी भारतीय संस्कृतीशी माझे नाते नेहमीच घट्ट आणि अभिमानाचे राहील.

अमेरिकेच्या धोक्याची घंटा…
अमेरिका चालू वर्षामध्ये आपल्या स्वातंत्र्याचा २५०वा वर्धापनदिन साजरा करत असतानाच हे सर्वेक्षण समोर आल्याने या उत्सवावर चिंतेचे सावट आहे. स्थलांतरितांवर येणारे निर्बंध आणि विविधता व समानता उपक्रमांना होणाऱ्या विरोधामुळे आशियाई तरुण पिढी कमालीची नाराज आहे. आशियाई अमेरिकन हा अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणारा लोकसंख्या गट असून, त्यांच्यातील वाढती नाराजी ही अमेरिकेच्या भविष्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.