Ind W vs Pak W, T20 WC Match : दीप्ती शर्माची एतिहासिक कामगिरी; ५ बळींसह अनोखा विक्रम नावावर

Ind W vs Pak W, T20 WC Match : पाकविरुद्धच्या  विजयात हरमनप्रीत व दीप्ती चमकल्या. 

85
दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, ५ बळींसह
Ind W vs Pak W, T20 WC Match : दीप्ती शर्माची एतिहासिक कामगिरी; ५ बळींसह अनोखा विक्रम नावावर
  • ऋजुता लुकतुके

Ind W vs Pak W, T20 WC Match             भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात दीप्तीने अवघ्या १२ धावांत पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली आणि महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक कामगिरी नोंदवली. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

भारताने प्रथम फलंदाजी करत १७० धावांचा मजबूत डोंगर उभारला होता. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच खराब झाली. त्यानंतर दीप्तीने आपल्या अचूक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. तिने मधल्या फळीच्या पाकिस्तानच्या फलंदाजांना एकामागून एक बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

(हेही वाचा – US – Iran War Ends : ‘इराणबरोबरच्या तहानंतर मध्य-पूर्व आशियाचा चेहरामोहरा ५० वर्षांत बदलेल,’ – जेडी व्हान्स)

दीप्तीची अंतिम गोलंदाजी आकडेवारी ४ षटकांत १२ धावा आणि ५ बळी अशी राहिली. या कामगिरीमुळे ती महिला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्स घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. तसेच विश्वचषकातील भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रमही तिच्या नावावर जमा झाला. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

या शानदार कामगिरीमुळे दीप्तीने महिला टी-२० विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तिच्या फिरकीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांना टिकाव धरणे कठीण गेले. अनेक फलंदाज बचावात्मक पवित्र्यात खेळत असतानाच तिने महत्त्वाचे बळी मिळवत पाकिस्तानच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माला आगामी दिवसांत वैभव सुर्यवंशीचे आव्हान?)

दीप्तीच्या या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या १०६ धावांत आटोपला आणि भारताने ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषक मोहिमेची दमदार सुरुवात केली. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

सामन्यानंतर दीप्तीच्या कामगिरीचे क्रिकेटविश्वातून जोरदार कौतुक झाले. माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी तिच्या नियंत्रण, अचूकता आणि दबावाखाली बळी मिळवण्याच्या क्षमतेचे विशेष कौतुक केले. भारताच्या फिरकी आक्रमणातील प्रमुख शस्त्र म्हणून ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकातही ती गाजली होती. (Ind W vs Pak W, T20 WC Match)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.