US – Iran War Ends : ‘इराणबरोबरच्या तहानंतर मध्य-पूर्व आशियाचा चेहरामोहरा ५० वर्षांत बदलेल,’ – जेडी व्हान्स

US - Iran War Ends : अमेरिकेची तहाविषयीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. 

120
जेडी व्हान्स अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या भाषणात.
US - Iran War Ends : ‘इराणबरोबरच्या तहानंतर मध्य-पूर्व आशियाचा चेहरामोहरा ५० वर्षांत बदलेल,’ - जेडी व्हान्स
  • ऋजुता लुकतुके

US – Iran War Ends                   अमेरिका आणि इराण यांच्यात प्रस्तावित शांतता करार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या कराराबाबत मोठा दावा केला आहे. इराणने करारातील अटींचे पालन केल्यास हा करार पुढील ५० वर्षांसाठी मध्यपूर्वेचे चित्र बदलून टाकेल, असे व्हान्स यांनी म्हटले आहे. तसेच करारावर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः उपस्थित राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. (US – Iran War Ends)

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स म्हणाले की, “इराणने कराराचे पालन केले तर मध्यपूर्वेत स्थैर्य, आर्थिक विकास आणि ऊर्जा सुरक्षेचे नवे पर्व सुरू होईल. यामुळे केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला फायदा होईल.” तेलाच्या किमती कमी होण्यास आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासही हा करार मदत करेल, असा त्यांचा विश्वास आहे. (US – Iran War Ends)

(हेही वाचा – Nature Photography Day : कॅमेऱ्यातून निसर्गाशी जुळणारे नाते)

अमेरिका आणि इराण यांच्यातील प्राथमिक करारानुसार होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाणार आहे. तसेच युद्धविराम कायम ठेवून पुढील ६० दिवसांत इराणच्या अणुकार्यक्रमासह अनेक संवेदनशील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. अमेरिकेकडून काही निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने सवलत देण्याचाही विचार सुरू आहे. (US – Iran War Ends)

व्हान्स यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या करार स्वाक्षरी समारंभाला ते स्वतः उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मात्र ट्रम्प अखेरच्या क्षणी स्वतः उपस्थित राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. सध्या ट्रम्प यांचा जी-७ परिषदेसाठी युरोप दौरा सुरू असल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. (US – Iran War Ends)

(हेही वाचा – FSSAI ची तीन मोठ्या ब्रँड्सवर कारवाई! मॅगी, KFC आणि फ्लिपकार्ट मिनिट्सला नोटीस; ‘त्या’ व्हिडीओमुळे खळबळ!)

या कराराला युरोपातील प्रमुख देशांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांनी मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनीही या घडामोडीचे स्वागत केले आहे. (US – Iran War Ends)

तथापि, सर्व प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. विशेषतः इराणचा अणुकार्यक्रम, युरेनियम साठे आणि प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पुढील वाटाघाटी होणे बाकी आहे. त्यामुळे कराराची दिशा सकारात्मक असली तरी त्याची यशस्वी अंमलबजावणी हेच खरे आव्हान असणार आहे. (US – Iran War Ends)

(हेही वाचा – एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून Smart card अनिवार्य)

दरम्यान, करारावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यास तो मध्यपूर्वेतील गेल्या अनेक दशकांतील सर्वात महत्त्वाचा राजनैतिक करार ठरू शकतो, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. (US – Iran War Ends)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.