FSSAI ची तीन मोठ्या ब्रँड्सवर कारवाई! मॅगी, KFC आणि फ्लिपकार्ट मिनिट्सला नोटीस; ‘त्या’ व्हिडीओमुळे खळबळ!

FSSAI ची तीन मोठ्या ब्रँड्सवर कारवाई! मॅगी, KFC आणि फ्लिपकार्ट मिनिट्सला नोटीस; 'त्या' व्हिडीओमुळे खळबळ!

115
FSSAI
FSSAI

गेल्या अनेक वर्षांपासून आपण सुप्रसिद्ध ब्रँडचे (FSSAI) अन्न पदार्थ कायम डोळे झाकून विकत घेत असतो. त्यातील सर्वात आवडीचा पदार्थ आहे मॅगी. भूक लागल्यावर दोन मिनिटांमध्ये तयारी होणारी मॅगी आजही सगळ्याच घरातील किचनमध्ये तुम्हाला सापडते. पण सोशल मीडियावर तक्रार करण्यात आली आहे की, मॅगी नूडल्स आणि खजूरमध्ये किडे आढळले आहेत. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर KFC मध्ये अस्वच्छतेबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तक्रारची दखल FSSAIनं म्हणजे अन्न सुरक्षा नियामक संस्थाने घेतली आहे. त्यांनी 3 ब्रँडेड कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेनं दिली. (FSSAI)

मॅगी नूडल्सच्या पाकिटात कीड आढळल्याचा दावा एफएसएसएआयकडे आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट मिनिट्सद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थात किडे असल्याची तक्रार आली होती. त्यासोबत आंध्र प्रदेशातील एका केएफसी आउटलेटमध्ये अस्वच्छता असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या तक्रारांची दखल घेण्यात आली असून संबंधित कंपन्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविण्यात आलंय. (FSSAI)

हेही वाचा-Weather: हवामान खात्याकडे असते कोणती ‘महा-शक्ती’? सुपर कम्प्युटर्स आणि समुद्रातील सेन्सर्स कसे ओळखतात मान्सूनची चाल?

या तक्रारीवर आणि मिळालेल्या नोटीसवर नेस्ले इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. नेस्लेने सांगितलं की, त्यांना ही तक्रार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरण (FSSAI) कडून मिळाली होती. जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर करण्यात आली होती. 12 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टवर NSE आणि BSE ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नेस्ले इंडियाने म्हटलंय की, “आम्ही मीडियामध्ये सुरू असलेले आरोप पूर्णपणे फेटाळतो आहोत. जे एका अनव्हेरिफाईड अकाउंटच्या आधारे मॅगी नूडल्समध्ये अळ्या असल्याचा दावा करत आहेत, हा आरोप आम्ही फेटाळतोय.” (FSSAI)

हेही वाचा- US Iran Peace Deal: होर्मुझची कोंडी सुटली, तेलाच्या किमती घसरल्या; भारतात डिझेल-पेट्रोलच्या दरात दिलासा मिळणार?

तक्रारीनंतर कंपनीने स्पष्ट करण्यात आलंय की, त्यांना अद्याप तक्रारदाराकडून तपासासाठी उत्पादनाचा कोणताही नमुना मिळालेला नाही. एवढंच नाहीतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसादही आलेला नाही. संबंधित सोशल मीडिया अकाउंट देखील सध्या संपर्कात नसल्याने यातून काही पुष्टी होत नाही. नेस्ले इंडियाने स्पष्ट केलं की, मानक प्रक्रियेचा भाग म्हणून, त्याच बॅचचा नमुना एफएसएसएआई द्वारे मान्यताप्राप्त आणि एनएबीएल (NABL) स्वीकृत स्वतंत्र लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग आढळलेला नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. (FSSAI)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.