पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर ‘Brown Booby’ दुर्मिळ समुद्री पक्ष्याचे दर्शन 

458
दुर्मिळ Brown Booby समुद्री पक्षी रत्नागिरी किनाऱ्यावर.
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर Brown Booby पक्षाचे दर्शन.

रत्नागिरी जिल्ह्याला (Ratnagiri Districk) विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलांमुळे निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. याच समृद्ध पर्यावरणाचा एक भाग म्हणून रत्नागिरीच्या हर्णे बंदर (harne Banadar) आणि गुहागर किनारपट्टीवर ‘ब्राऊन बूबी’ (Brown Booby) नावाचा अत्यंत दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी खोल समुद्रात राहणारा असल्याने किनाऱ्यावर दिसणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. हा अद्वितीय पक्षी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी आणि निसर्गप्रेमींनी किनारपट्टीवर मोठी गर्दी केली होती. (Brown Booby)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या युरोप दौऱ्याचा फ्रान्समधून शानदार प्रारंभ; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत शिखर परिषदेचे उद्घाटन )

‘महाधनेश’ आणि इतर दुर्मिळ प्रजातींचे हक्काचे घर
रत्नागिरीच्या वैविध्यपूर्ण निसर्गामुळे या भागाला ‘महाधनेश’ (Great Indian Hornbill) या अत्यंत भव्य आणि दुर्मिळ पक्ष्याचे प्रमुख केंद्र म्हणून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले आहे. याशिवाय येथील जंगलांमध्ये, खाजण पट्ट्यांमध्ये आणि सड्यांवर तिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, निळ्या दाढीवाला राघू आणि बेडूकतोंड्या यांसारखे जगातील वैशिष्ट्यपूर्ण पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. या पक्षीवैविध्यामुळे रत्नागिरी जिल्हा आता जागतिक स्तरावर पक्षी निरीक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.