-
ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेटमध्ये “सुपरस्टार संस्कृती” असावी की नाही, यावरून पुन्हा मोठी चर्चा रंगली आहे. माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(Rahul Dravid)यांनी सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीरच्या भूमिकेला थेट विरोध दर्शवला आहे. भारतीय क्रिकेटला विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे नायक आवश्यक असल्याचे परखड स्पष्ट मत द्रविडने व्यक्त केले.(Rahul Dravid)
गौतम गंभीरने प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर अनेकदा “संघ सर्वात महत्त्वाचा” असल्याचे सांगत सुपरस्टार संस्कृती कमी करण्यावर भर दिला आहे. कोणताही खेळाडू संघापेक्षा मोठा नसतो, अशी त्याची भूमिका राहिली आहे. मात्र राहुल द्रविडच्या मते, प्रत्येक खेळाला प्रेरणा देणारे नायक आवश्यक असतात. “लोक नायक विनाकारण होत नाहीत. त्यामागे सातत्यपूर्ण कामगिरी आणि संघासाठी दिलेले योगदान असते,” असे तो म्हणाला.(Rahul Dravid)
द्रविडने विशेषतः विराट कोहली आणि रोहित शर्माचा उल्लेख करत त्यांची जागा भरून काढणे अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. त्याच्या मते, अशा खेळाडूंमुळेच तरुण पिढी क्रिकेटकडे आकर्षित होते आणि देशभरात खेळाची लोकप्रियता वाढते. “भारतासारख्या देशात सुपरस्टार होणे सोपे नसते. त्यासाठी वर्षानुवर्षे सातत्याने सर्वोच्च पातळीवर खेळावे लागते,” असे द्रविडने स्पष्ट केले.(Rahul Dravid)
भारतीय कसोटी संघाच्या अलीकडील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक महत्त्वाची ठरत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये भारताला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे संघातील संक्रमण आणि वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.(Rahul Dravid)
दरम्यान, द्रविडच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. काहींनी गंभीरच्या संघकेंद्रित विचारांचे समर्थन केले, तर अनेकांनी द्रविडच्या मताशी सहमती दर्शवत “क्रिकेटला नेहमीच नायकांची गरज असते” असे मत व्यक्त केले.(Rahul Dravid)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

