
-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli MIDC डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील भूखंडधारकांना आपले वार्षिक भू-भाडे एक रूपया भरण्यासाठी ठाण्याला जावे लागत असे. त्यासाठी प्रवासात वेळ व पैसा खर्च होत असे. आता हीच सुविधा डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तरीही भू-भाडे भरण्यास निवासी भूखंडधारकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. शुक्रवारी शेवटचा दिवस असताना देखील भूखंडधारकांनी या सुविधेचा उपभोग घेतला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Dombivli MIDC)
अनेक भुखंडधारकांकडून मागील काही वर्षांपासून भू-भाडे भरले गेले नव्हते. डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयात प्रत्यक्ष, तसेच ऑनलाईन पद्धतीने भू-भाडे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी आणि मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून तात्पुरत्या स्वरूपात सदर भू-भाडे भरण्यासाठी हीच सुविधा डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयात उपलब्ध करून दिली होती. (Dombivli MIDC)
४ ते १५ मे पर्यंत ही सुविधा उपलब्ध असताना १४ मे पर्यंत फक्त ८४ निवासी भुखंडधारकांनी या सेवेचा लाभ घेतला. निवासी विभागामध्ये जवळपास ६०० निवासी भुखंड असताना फक्त ८४ जणांनी म्हणजे १४ टक्के जणांनी १४ मे पर्यंत आपले वार्षिक भू-भाडे भरले आहे. शुक्रवारी १५ मे रोजी भू-भाडे भरण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यालयात अखेरचा दिवस असल्याने या दिवशी फक्त ९ भूखंडधारकांनी प्रतिसाद दिला. अर्थात या सुविधेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. एकंदर परिस्थिती पाहता वार्षिक भू-भाडे भरण्यास निवासी भूखंडधारकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. (Dombivli MIDC)
(हेही वाचा – Madhya Pradesh High Court: भोजशाळा संकुल मशीद नाही, तर…उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)
या मागची मुख्य चार कारणे…
१) भू-भाडे भरण्यासाठी अल्पमुदत दिली आहे. त्यात शनिवार-रविवार एमआयडीसी कार्यालयाला सुट्टी असते.
२) भुखंडधारकांना त्यांची शिल्लक रक्कम किती आहे हे समजून येत नसल्याने अंदाजित रक्कम भरून त्याची पडताळणी एमआयडीसीच्या ठाणे कार्यालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी अंतिम पावती तयार होऊन डोंबिवली कार्यालयात येत आहे. त्यामुळे भुखंडधारकांना दोनदा डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात चक्कर मारावी लागत आहे.
३) मे महिना सुट्टीचा असल्याने अनेक रहिवाशी गावी, तसेच फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत.
४) कडक उन्हाळ्याची गर्मी असल्याने उन्हात बाहेर पडण्यास रहिवासी कचरत आहेत. (Dombivli MIDC)
(हेही वाचा – Amravati: अमरावती पोलिसांच्या “एअर कूल्ड जॅकेटची” सर्वत्र चर्चा; कशी आहे या जॅकेटची प्रणाली?)
डोंबिवलीत कायमस्वरूपी सुविधा व्हावी
शुक्रवार १५ मे या अखेरच्या दिवशी राहिलेल्या निवासीधारकांनी आपले भुखंड भाडे भरावे, असे आवाहन मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनने केले होते. तसेच एमआयडीसी प्रशासनाने भू-भाडे भरण्याची सुविधा कायमस्वरूपी डोंबिवलीतील कार्यालयात, तसेच ऑनलाईन करावी, अशी मागणी एमआयडीसीकडे केली आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनसह भूखंडधारकांच्या नजरा लागल्या आहेत. (Dombivli MIDC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
