-
ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दमदार विजयानंतर प्रतिस्पर्धी संघांना थेट इशारा दिला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने सर्वांगीण खेळ करत हैदराबादचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयानंतर शुभमनने केलेले वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.(GT vs SRH highlights)
(हेही वाचा – Malad मध्ये धर्मांतराचा प्रयत्न आणि जादूटोण्याचा प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल )
सामन्यानंतर बोलताना शुभमन म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती आणि संघाच्या अंतर्गत चर्चेत १६० ते १७० धावांचा टप्पा गाठण्यावर भर होता. आपल्या गोलंदाजांच्या जोरावर हे लक्ष्य प्रतिस्पर्ध्यांसाठी कठीण ठरेल, असा विश्वास संघाला होता. शुभमनचा हा आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन त्याच्या नेतृत्वगुणांची झलक दाखवणारा ठरला.(GT vs SRH highlights)
Shubman Gill : “We don’t play any brand of cricket , we play accordingly ”
-🤯Clearly Doing that thing which he did in Instagram after winning the match pic.twitter.com/JWUlOqFFnD— Yash🦅 (@YashCricOG) May 12, 2026
आयपीएलमध्ये २० षटकांत २०० ती घावसंख्या सहज गाठली जात असताना सुरुवातीपासून १७० धावांचं संरक्षण करण्याच्या गिलच्या आत्मविश्वासाचं कौतुक होत आहे. संघाने मागील सलग पाच सामने निर्विवाद जिंकले आहेत.(GT vs SRH highlights)
या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी संयमी पण प्रभावी खेळ केला. त्यानंतर गोलंदाजांनी सनरायझर्सच्या फलंदाजीवर पूर्ण वर्चस्व मिळवले. विशेषतः गुजरातच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासून दबाव निर्माण केला. त्यामुळे हैदराबादचा डाव कधीच रुळावर आला नाही.(GT vs SRH highlights)
याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयानंतरही शुभमनने “आम्ही अजून परिपूर्ण सामना खेळलेलो नाही” असे म्हणत इतर संघांना इशारा दिला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेत अधिक धोकादायक बनत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.(GT vs SRH highlights)
आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सने सातत्यपूर्ण कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले आहे. शुभमनच्या नेतृत्वाखाली संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत संतुलित दिसत आहे. प्लेऑफपूर्वीच गुजरातने इतर संघांवर मानसिक दबाव निर्माण केल्याचे मानले जात आहे.(GT vs SRH highlights)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

