Mumbai Firing Case : मुंबई पुन्हा गोळीबाराने हादरली; भायखळ्यात तरुणावर भररस्त्यात फायरिंग, परिसरात खळबळ

85
Mumbai Firing Case : मुंबई पुन्हा गोळीबाराने हादरली; भायखळ्यात तरुणावर भररस्त्यात फायरिंग, परिसरात खळबळ
  • प्रतिनिधी 

Mumbai Firing Case                राजधानी मुंबईत गुन्हेगारांचे धाडस पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसत आहे. भायखळा परिसरात मंगळवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात समीर आसिफ शेख (३८) नावाचा तरुण जखमी झाला असून, त्याच्या पायाला गोळी लागली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (Mumbai Firing Case)

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथील डॉकयार्ड रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. समीर शेख हा आपल्या कामात असताना अचानक हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी समीरच्या पायाला लागली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच पळापळ झाली. (Mumbai Firing Case)

(हेही वाचा – Gold Price Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही जळगावात दागिन्यांची खरेदी जोरात; काय आहेत आजचे भाव ?)

घटनेनंतर जखमी समीरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, गोळी पायाला लागल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस आणि गुन्हे शाखेचे (Crime Branch) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. (Mumbai Firing Case)

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की यामागे काही अन्य व्यावसायिक वाद आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. “आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Mumbai Firing Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.