Gold Price Today : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही जळगावात दागिन्यांची खरेदी जोरात; सोन्या-चांदीच्या दरात उसळी

116

वर्षभर सोने आणि चांदी खरेदी न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. (Gold Price Today) मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे या आवाहनाचा जळगावच्या सराफ बाजारात फारसा परिणाम झालेला दिसत नाही. (PM Modi Gold Appeal) उलटपक्षी, आवाहनाच्या दुसऱ्याच दिवशी जळगावच्या प्रसिद्ध सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी कायम आहे.

(हेही वाचा – Leopard attack : राजापूरमध्ये दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, तरुण गंभीर जखमी)

जळगावच्या (Jalgaon) सराफ बाजारात आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात १० हजार रुपयांची मोठी उसळी आली आहे. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ७७ हजार ७० रुपयांपर्यंत गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्याने सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. (US Iran ceasefire)

एकीकडे सोन्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे तर दुसरीकडे पीएम मोदींनी केलेल्या आवाहनानंतर सोन्याच्या व्यापारांचेदेखील टेन्शन वाढले आहे. सध्या ऐन लग्नसराईत सोनं खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. दागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी नाहीये. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना फटका बसला आहे. दरम्यान, जर सोने खरेदी केले नाही तर कामगारांचे पैसे कसे देणार, असाही प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. (Gold Price Today)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.