Chaityabhoomi च्या निमंत्रणावर उपराष्ट्रपतींचा तत्काळ ‘होकार’; अण्णा बनसोडेंच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

83
Chaityabhoomi च्या निमंत्रणावर उपराष्ट्रपतींचा तत्काळ 'होकार'; अण्णा बनसोडेंच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
Chaityabhoomi च्या निमंत्रणावर उपराष्ट्रपतींचा तत्काळ 'होकार'; अण्णा बनसोडेंच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
  • ​विशेष प्रतिनिधी

​ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या आगामी जयंतीदिनी मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) एका विशेष पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान १४ एप्रिल रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्यासाठी उपराष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी हे निमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारले आहे.

​उपराष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीत सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. केवळ निमंत्रण स्वीकारून ते थांबले नाहीत, तर दादर (Dadar) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. या स्मारकाच्या कामाला अधिक वेग मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याशी स्वतः चर्चा करणार असल्याचा शब्दही त्यांनी शिष्टमंडळाला दिला.

(हेही वाचा – Navi Mumbai Airport च्या कामगार वर्गात नवी ऊर्जा; रविंद्र चव्हाणांकडून ‘पॉवरफुल’ टीमची घोषणा)

​या महत्त्वाच्या बैठकीत बोधगया येथील प्रलंबित प्रश्नांवरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींशी सविस्तर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपराष्ट्रपतींना भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

​या ऐतिहासिक भेटीप्रसंगी सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार, सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे यंदाच्या आंबेडकर जयंती सोहळ्याला एक विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.