IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्सची दिमाखात सुरुवात, कोलकात्यावर ६ गडी, ५ चेंडूंनी मात

IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्सची दिमाखात सुरुवात, कोलकात्यावर ६ गडी, ५ चेंडूंनी मात

96
IPL 2026 : पराभवाच्या वेळीही मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये कसं असतं वातावरण?
IPL 2026 : पराभवाच्या वेळीही मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये कसं असतं वातावरण?
  • ऋजुता लुकतुके

आधुनिक टी-२० चा चेहरामोहरा नेमका कसा असेल हे दाखवणारं क्रिकेट आयपीएलच्या या हंगामात पहिले दोन दिवस पाहायला मिळालं आहे. सामने बंगळुरूचं चिन्नास्वामी मैदान आणि मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होते. आणि आकाराने छोटी आणि खेळपट्टीही फलंदाजीला पोषक असेल तर धावांचा पाऊस पडणारच. त्यातही बंगळुरू आणि मुंबईसारख्या तगड्या संघांनी आक्रमकतेचाही नवा प्रघात पाडला आहे. रविवारी मुंबई इंडियन्सना कोलकात्याच्या २१९ धावांचा पाठलाग करायचा होता. पण, रोहित शर्मा आणि रायन रिकलटन या सलामीवीरांनीच सामना कोलकातापासून कोसो दूर नेला. पहिल्या ६ षटकांत दोघांनी ८० धावा लुटल्या. आणि त्या करताना वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, कार्तिक त्यागी आणि ब्लेसिंग मुझराबानी या फिरकी आणि तेज गोलंदाजांना धू धू धुतलं.(IPL 2026, MI vs KKR)

(हेही वाचा – उज्ज्वला LPG योजना ते आत्मनिर्भरता )

दोघंही षटकार तर लिलया मारत होते. बाराव्या षटकांत अखेर रोहित ३८ चेंडूंत ७८ धावा करत बाद झाला. पण, तोपर्यंत त्याने ६ षटकार आणि ६ चौकारांची बरसात केली होती. आणि संघाच्या १४८ धावा फलकावर लागलेल्या होत्या. बरं रोहित बाद झाला म्हणून रिकलटनला काहीही फरक पडला नाही. तो फटकेबाजी करतच राहिला. अखेर सोळाव्या षटकांत रिकलटन दुर्दैवीरित्या दुसरी धाव चोरताना धावचित झाला. त्याने ४३ चेंडूंत ८१ धावा करताना ८ षटकार आणि ४ चौकारांती आतषबाजी केली. या हंगामातील पहिलं शतक बघण्याची संधी त्यामुळे हुकली.(IPL 2026, MI vs KKR)

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन हे अनुभवी फिरकीपटू असले तरी त्यांची तेज गोलंदाजी कमालीची दुबळी आहे. त्यामुळे त्यांना धावा मजबूत कराव्या लागणार होत्या. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्याची पुरेपूर काळजी घेतली. तो सलामीलाच फलंदाजीला आला. आणि आक्रमक सुरुवात करत त्याने ४० चेंडूंत ६७ धावा केल्या. यात ५ षटकार आणि ४ चौकार होते. दुसऱ्या बाजूने फिन ॲलननेही ३७ धावा करत चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या १० षटकांत कोलकाताने १ बाद १२० धावांची मजल मारली होती. त्या मानाने मधल्या षटकांत त्यांची फलंदाजी काहीशी धिमी झाली.(IPL 2026, MI vs KKR)

कॅमेरुन ग्रीन १८ धावांवर बाद झाला. पण,  अंगक्रिश रघुवंशीने ५१ तर रिंकू सिंगने नाबाद ३३ धावा करत कोलकाताला २२० धावांचा टप्पा गाठून दिला. शेवटच्या षटकांमध्ये मुंबईकडून हार्दिक आणि जसप्रीत बुमरा प्रभावी ठरले. खासकरून बुमराने ४ षटकांमध्ये फक्त ८ च्या धावगतीने धावा देत कोलकाताला रोखलं. तिथेच कोलकाताला १०-२० धावा कमी पडल्या. आणि तोच या सामन्यातील फरक ठरला. अखेर मुंबईने ६ गडी गमावून हा सामना जिंकला.(IPL 2026, MI vs KKR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.