मोठी कारवाई! मानव तस्करी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा म्होरक्या CBI च्या जाळ्यात

मोठी कारवाई! मानव तस्करी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा म्होरक्या CBI च्या जाळ्यात

108
Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप
Crime News: कर्नल हिमांशु बालीला सीबीआयकडून अटक, ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप
मुंबई 

नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांना परदेशात नेऊन त्यांना ‘सायबर गुलाम’ बनवणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) यश आले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन ऊर्फ ‘क्रिश’ याला सीबीआयने मुंबईतून अटक केली आहे.

गेल्या काही काळापासून थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भारतीय तरुणांना म्यानमारमधील ‘मायवडी’ (विशेषतः केके पार्क) सारख्या दुर्गम भागात नेले जात होते. तपासानुसार, या तरुणांना दिल्लीहून बँकॉकला नेण्यात येत असे आणि तिथून चोरट्या मार्गाने म्यानमारमधील ‘सायबर स्कॅम सेंटर्स’मध्ये पाठवले जात असे.(CBI)

(हेही वाचा – BCCI : टीम इंडियाच्या २०२६-२७ च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय हंगामाचे वेळापत्रक जाहीर )

म्यानमारमधील या केंद्रांमध्ये भारतीय तरुणांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जगभरातील लोकांची फसवणूक करून घेतली जात होती. यामध्ये प्रामुख्याने:

  •  डिजिटल अरेस्ट स्कॅम्स
  • रोमान्स फ्रॉड (Honey Trapping)
  • क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट स्कॅम्स

अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. जर या तरुणांनी काम करण्यास नकार दिला, तर त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ, बेदम मारहाण आणि बंदिवासाला सामोरे जावे लागत होते.(CBI)

२०२५ मध्ये काही भारतीय तरुण या नरकातून सुटून थायलंडला पोहोचले होते. मार्च आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. सीबीआयने या पीडितांची सविस्तर चौकशी केल्यानंतर ‘क्रिश’चे नाव समोर आले. तो या संपूर्ण ट्रॅफिकिंग नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.(CBI)

सुनील ऊर्फ क्रिश भारतात परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने पाळत ठेवून त्याला मुंबईतून अटक केली. त्याच्या घराच्या झडतीमध्ये म्यानमार आणि कंबोडियातील मानवी तस्करीशी संबंधित अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.(CBI)

या रॅकेटमध्ये गुंतलेल्या इतर विदेशी नागरिकांचा आणि भारतीय हस्तकांचा शोध सीबीआय घेत असून, या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(CBI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.