Pakistan Fuel Price Hike: इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानचे दिवाळे निघाले; पेट्रोल ३०० रुपये लिटर

Pakistan Fuel Price Hike: इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानचे दिवाळे निघाले; पेट्रोल ३०० रुपये लिटर

109
Pakistan Fuel Price Hike
Pakistan Fuel Price Hike

सध्या जगभरात इराण-इस्रायल युद्धाची (Pakistan Fuel Price Hike) चर्चा सुरू आहे. एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका हे देश प्रत्यक्ष युद्ध भूमीत उतरले असले तरी, दुसरीकडे या युद्धाची झळ इतर देशांना देखील लागली आहे. इराणने या युद्ध काळात होर्मुझ सामुद्रधुनीवर निर्बंध लादल्याने या मार्गाने होणारी तेल वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम जगभरातील इतर देशांना भोगावे लागत आहे. तेलाची वाहतूक ठप्प झाल्याने तेल आणि इंधनाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. या सगळ्या दरम्यानच, भारताचा शेजारी देश अर्थात पाकिस्तानची आणखी कोंडी झाली आहे. (Pakistan Fuel Price Hike)

हेही वाचा-Pakistani Spy: वायुसेनेची मोठी कारवाई! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सुमित कुमारला बेड्या

अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्या युद्धात पाकिस्तानचे दिवाळे निघाले आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असतानाच आता पाकिस्तानवर आणखी एक संकट कोसळले आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेवर आता इंध दरवाढीचा नवा बॉम्ब पडला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी एक मोठा निर्णय घेत ‘हाय-ऑक्टेन’ इंधनावरील करात प्रचंड वाढ केली असून, आता हे इंधन ३०० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. (Pakistan Fuel Price Hike)

हेही वाचा- Unseasonal Rain: मार्च संपत आला तरी पावसाचा ‘खेळ’ सुरूच! आता मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट

पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लक्झरी गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय-ऑक्टेन इंधनावर यापूर्वी १०० रुपये प्रति लिटर लेव्ही आकारली जात होती, ती आता थेट २०० रुपयांनी वाढवून ३०० रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला दरमहा ९ अब्ज रुपयांची बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. हा पैसा सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी वापरला जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. (Pakistan Fuel Price Hike)

हेही वाचा- Terrorist Recruitment in Schools: PoK तील शाळांमध्ये आता दहशतवादाचे ‘धडे’; ७ ते १३ वर्षांच्या मुलांच्या हातात पेनऐवजी बंदूक

किंमती वाढणार असल्याची घोषणा होताच पाकिस्तानमधील प्रमुख शहरांतील पेट्रोल पंपांवर लोकांच्या रांगा लागल्या. महागडे तेल खरेदी टाळण्यासाठी नागरिक आपल्या गाड्यांच्या टाक्या भरून घेण्यासाठी धावपळ करताना दिसले. सध्या ही वाढ केवळ हाय-ऑक्टेन इंधनासाठी करण्यात आली असली, तरी सामान्य गाड्यांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे जनता चिंतेत आहे. (Pakistan Fuel Price Hike)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.