Accident: न्यूयॉर्क विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाची ट्रकशी टक्कर, Video

Accident: न्यूयॉर्क विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाची ट्रकशी टक्कर, Video

86
Accident
Accident

न्यूयॉर्कमधील (Accident) ला गार्डिया विमानतळावर एअर कॅनडा एक्सप्रेसच्या एका विमानाची जमिनीवर उभ्या असलेल्या वाहनाशी धडक झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले. (Accident)

हेही वाचा-Unseasonal Rain: मार्च संपत आला तरी पावसाचा ‘खेळ’ सुरूच! आता मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट

फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइटने रात्री ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, विमानतळावर प्रवाशांना बाहेर काढण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे. नियामक संस्थेने जारी केलेल्या नोटिसनुसार, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने विमानतळावरील सर्व विमानांसाठी ‘ग्राउंड स्टॉप’ (उड्डाणे तात्पुरती थांबवण्याचा आदेश) लागू केला आहे. (Accident)

हेही वाचा- Terrorist Recruitment in Schools: PoK तील शाळांमध्ये आता दहशतवादाचे ‘धडे’; ७ ते १३ वर्षांच्या मुलांच्या हातात पेनऐवजी बंदूक

एफएएच्या नोटिसनुसार, विमानतळावर लावण्यात आलेल्या निर्बंधाचे कारण आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले असून, ही बंदी पुढे वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी अद्याप जखमींची संख्या किंवा नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यामध्ये विमानतळावर प्रवाशांना बाहेर काढण्याचे आणि बचावकार्य सुरू असल्याचे दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये प्रवासी विमानातून बाहेर पडताच विमानाचा पुढील भाग काही अंशांनी वर उचलला गेल्याचे दिसून येते. (Accident)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.