राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Sunetra Pawar Oath Of DCM) यांच्या अकाली निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीची भर घालण्यासाठी पक्षाने हालचालींना वेग दिला असून, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Oath Of DCM) यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Sunetra Pawar Oath Of DCM)
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वा. सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. (Sunetra Pawar Oath Of DCM)
हेही वाचा- Nagpur Airport : प्रवासांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘इतक्या’ विमानांची झाली उड्डाणे
उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे रिक्त होणाऱ्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (Sunetra Pawar Oath Of DCM)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

