मुंबई:
मुंबई रेल्वे पोलिस(Mumbai Railway Police)दलाला हादरवून टाकणारा आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हाँगकाँगमध्ये ५५० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीतून दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून रेल्वे पोलिस गुन्हे शाखेत कार्यरत एका पोलीस हवालदार यांना सुमारे ९२.५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार बाहेरील दुसरे कोणी नसून रेल्वे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे.पीडित पोलीस हवालदार यांच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) रवींद्र सुखदेव दरेकर, सुरेश मनोहर घुले आणि दत्तात्रय महादेव मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दरेकर याला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.(Mumbai Railway Police)
शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस हवालदार योगेश जालिंदर अदाटे (४३) यांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, वरिष्ठ सहकारी दरेकर व त्यांचे कथित व्यावसायिक भागीदार घुले आणि मोहिते यांनी संगनमत करून त्यांची फसवणूक केली. आरोपींनी त्यांच्या सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीला हाँगकाँगमधून ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्याचा दावा केला, मात्र आरबीआय नियम व कर प्रक्रियेमुळे ही रक्कम अडकल्याचे सांगितले. ती रक्कम मोकळी करण्यासाठी निधीची गरज असल्याचे सांगून अदाटे यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली आणि दुप्पट परताव्याचे आश्वासन दिले.(Mumbai Railway Police)
फेब्रुवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत रोख, आरटीजीएस, बँक ट्रान्सफर आणि हवाला मार्गे पैशे उकळण्यात आले. पैसे उभारण्यासाठी अदाटे यांनी घर गहाण ठेवून कर्ज घेतले, जीपीएफमधून रक्कम काढली, पोलिस सोसायटीकडून कर्ज घेतले आणि तब्बल ४७ तोळे सोने विकल्याचे तक्रारीत नमूद आहे.(Mumbai Railway Police)
(हेही वाचा – Nagpur Airport : प्रवासांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘इतक्या’ विमानांची झाली उड्डाणे )
नंतर पैसे परत मागितल्यावर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली आणि धमक्याही दिल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये विश्वास टिकवण्यासाठी आरोपींनी ९० लाख रुपयांचे पोस्ट-डेटेड धनादेश दिले; मात्र बँक तपासणीदरम्यान ते ओव्हररायटिंग व तांत्रिक त्रुटींमुळे संशयास्पद आढळले.(Mumbai Railway Police)
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अशाच प्रकारे इतरांकडूनही गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळले आहेत. कॉल रेकॉर्डिंग, बँक व्यवहार व संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असून तपास सुरू आहे.(Mumbai Railway Police)
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सीएसएमटी विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत लिखित अहवाल सादर केला होता. मात्र कायदेशीर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्या चौकशीचे आदेश देऊन वेळकाढूपणा केल्याची चर्चा आहे. विभागात संशयित आरोपी दरेकर यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांकडूनही सुमारे १५ ते १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा असून हवाला व्यवहारांचाही वापर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास शिवाजी पार्क पोलिस ठाणे करीत आहे.(Mumbai Railway Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

