BMC Mayor: मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर तर उपमहापौर शिवसेनेचा?

123
Kandivali मध्ये बीएमसीचा 'बुलडोझर पॅटर्न'; ६५ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त
Kandivali मध्ये बीएमसीचा 'बुलडोझर पॅटर्न'; ६५ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुंबई महापालिकेतील (BMC Mayor) सत्तेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेचा ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद (BMC Mayor) भाजप कडे, स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (BMC Mayor)

हेही वाचा-Demat Accounts : देशात डिसेंबरपर्यंत उघडली ‘इतकी’ नवीन डीमॅट खाती; आर्थिक साक्षरतेत वाढ

मुंबई महापालिकेत भाजपचे यापूर्वी प्रभाकर पै महापौर बनले होते. ते 1982 मध्ये मुंबईचे महापौर होते. आता पुन्हा एकदा मंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार आहे. तब्बल 25 वर्षानंतर ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्ता जाऊन महापौरपद भाजपकडे येणार आहे. (BMC Mayor)

हेही वाचा- E-Pink Rickshaw Scheme : पहिल्या टप्प्यात ६०० महिलांना रिक्षा मिळणार; आरटीओकडून प्रशिक्षण, परवाना मोफत

महापालिकेतील सत्ता समीकरणांसदर्भात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती, त्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. महायुतीत येणाऱ्या काळात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळेल, मात्र आता ही दोन्ही पदं भाजपकडे राहणार असल्याची शक्यता आहे. प्रभाग समिती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. (BMC Mayor)

हेही वाचा- Cyber Fraud : तरुणींनो, इंस्टाग्राम वापरताय तर आत्ताच सावध व्हा! धक्कादायक प्रकार समोर

ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर इथे शिवसेनेचा महापौर आणि भाजपच्या उपमहापौर असेल. तर, मुंबईत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (BMC Mayor)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.