Ind vs NZ, T20 Series : ईशान किशन अखेरच्या टी-२० सामन्यात खेळणार का, सितांशू कोटक काय म्हणाले?

63
Ind vs NZ, T20 Series : ईशान किशन अखेरच्या टी-२० सामन्यात खेळणार का, सितांशू कोटक काय म्हणाले?
Ind vs NZ, T20 Series : ईशान किशन अखेरच्या टी-२० सामन्यात खेळणार का, सितांशू कोटक काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

शनिवारी थिरुअनंतपुरम इथं होणारा न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा टी-२० सामना(Ind vs NZ, T20 Series)हा भारतासाठी टी-२० विश्वचषकापूर्वी सरावाची शेवटची संधी आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारीपासून विश्वचषकाचं बिगुल वाजेल. त्यामुळे तयारीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असले. अशा या सामन्यापूर्वी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक चांगलेच सकारत्मक दिसले. त्यानी संजू सॅमसनच्या खराब फॉर्मवर भाष्य करताना त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका नसल्याचे स्पष्ट केले. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत संजूला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसली, तरी संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे कोटक यांनी सांगितले.(Ind vs NZ, T20 Series)

या मालिकेतील चार सामन्यांत संजू सॅमसनला केवळ ४० धावा करता आल्या असून त्याची सरासरी १० इतकी आहे. मात्र कोटक म्हणाले, “संजू हा ज्येष्ठ आणि दर्जेदार खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येतात. कधी सलग पाच डावांत धावा होतात, तर कधी थोडा कठीण काळ येतो. हे क्रिकेटचा भाग आहे.”(Ind vs NZ, T20 Series)

(हेही वाचा – Demat Accounts : देशात डिसेंबरपर्यंत उघडली ‘इतकी’ नवीन डीमॅट खाती; आर्थिक साक्षरतेत वाढ )

संघ व्यवस्थापनाचे काम खेळाडूला मानसिकदृष्ट्या सकारात्मक ठेवण्याचं आहे, असं सांगत कोटक यांनी संजू मेहनत घेत असल्यावर भर दिला. “तो नेट्समध्ये नियमित सराव करतो आहे. आम्हाला माहीत आहे की संजू काय करू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.(Ind vs NZ, T20 Series)

संजूने खरंच शुक्रवारी गवताळ खेळपट्टीवर एक तास फलंदाजीचा भरपूर सराव केला. साइडआर्म थ्रोअर आणि अक्षर पटेलविरुद्ध त्याने सराव केला. सरावादरम्यान त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्याशी चर्चा केली. शनिवारी संजू खेळल्यास त्याचा हा घरच्या मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरेल.(Ind vs NZ, T20 Series)

दरम्यान, कोटक यांनी न्यूझीलंड आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ही आगामी टी-२० विश्वचषकासाठी अत्यंत महत्त्वाची तयारी असल्याचे सांगितले. “या सामन्यांतून अंतिम अकरा खेळाडू ठरवण्याची संधी मिळते,” असे ते म्हणाले.(Ind vs NZ, T20 Series)

चौथा टी-२० सामना दुखापतीमुळे चुकवलेला ईशान किशन पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघाला पॉवरप्लेमध्ये फायदा होत असल्याचेही कोटक यांनी सांगितले. तसेच अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.(Ind vs NZ, T20 Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.