शिस्त, साहस आणि देशप्रेम; Maharashtra Military School मधील विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

594
Maharashtra Military School students performing a drill.
Students showcased impressive skills during the Republic Day event.

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) येथे ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय देखणा असा विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख शिरीष अत्रे तसेच बँक ऑफ बडोदा या बँकेच्या निवृत्त अधिकारी अलका गोडबोले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र मिलिटरी स्कूल व  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट‘चे संपादक रणजित सावरकर तसेच महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे (Maharashtra Military School) पदाधिकारी देवेंद्र गंद्रे, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे, चित्रा रणजित सावरकर आदी मान्यवर, संस्थेचे सर्व शिक्षकगण व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

IMG 20260126 103110644 HDR.jpg scaled

(हेही वाचा Republic Day 2026 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात प्रा. स्नेहल पाठक यांच्या हस्ते ध्वजवंदन)

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत, संचलन आणि साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांच्या या चित्तथरारक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कराटे, योगासने यांसारख्या खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवली. फक्त सैनिकी शिक्षणच नाही तर राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणारी शाळा हे महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे (Maharashtra Military School) वैशिष्ट्य आहे, असे करणारी बहुदा महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा आहे. सैनिकी शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण तसेच मूल्य शिक्षणावर  येथे भर दिला जातो. यामुळेच मुलांचा सर्वांगीण विकास होऊन अमुलाग्र प्रगती होते, असे येथील मुलांचे पालक सांगतात.

VID 20260126 112445306.mp4.00 00 37 07.Still001.jpg scaled

Maharashtra Military School सामर्थ्यवान आणि सुसंस्कृत नागरिक घडविणारे केंद्र – शिरीष अत्रे

 

सैनिक शाळा ही  (Maharashtra Military School) केवळ शिक्षणाची ठिकाणे नसून ती देशप्रेम असलेले सामर्थ्यवान आणि शिस्तप्रिय नागरिक घडविणारी केंद्रे आहेत. येथील सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमुळे मुले केवळ शालेय जीवनातच नाही, तर संपूर्ण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम होतात, मनाचा कणखरपणा संकटांना सामोरं जाण्याचे धैर्य देतो. मोठ्यांचा आदर करणे, नम्रता आणि सुसंस्कृत वागणूक हे गुण सैनिक शाळेत मुलांच्या मनावर लहानपणीच बिंबवले जातात. ‘फ्रेंड्स अँड गुड मॅनर्स विल कॅरी यू व्हेअर मनी वोंट’ या उक्तीप्रमाणे पैशापेक्षा चांगली वागणूक माणसाला जीवनात मोठे करते, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख शिरीष अत्रे यांनी यावेळी म्हटले.

VID 20260126 105141075.mp4.00 00 01 18.Still001.jpg scaled

(हेही वाचा Maharashtra Military School म्हणजे सामर्थ्यवान आणि सुसंस्कृत नागरिक घडविणारे केंद्र; शिरीष अत्रे यांचे गौरवोद्गार)

प्रजासत्ताक दिनाची शान राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व्हावे – अलका गोडबोले

 

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून, इथली खरी सत्ता प्रजेच्या हाती आहे. आजच्या तरुण पिढीने केवळ स्वतःचा विचार न करता, आपल्या अभ्यासातील आणि कर्मातील एक तास देशासाठी दिला, तरच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन (77th Republic Day) सार्थ ठरेल, केवळ स्वातंत्र्य मिळवणे पुरेसे नसते, तर त्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी दिलेला लढा विसरता कामा नये, असे प्रतिपादन बँक ऑफ बडोदाच्या निवृत्त अधिकारी अलका गोडबोले यांनी केले.  (Maharashtra Military School)

VID 20260126 102740802.mp4.00 00 04 26.Still001.jpg scaled

(हेही वाचा 77th Republic Day : प्रजासत्ताक दिनाची शान राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व्हावे; अलका गोडबोले यांचे आवाहन)

Maharashtra Military School च्या कणाकणात राष्ट्रभक्ती – हेमंत चोपडे

या शाळेच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भिनलेली आहे, कारण या संस्थेची स्थापना आदरणीय विक्रमराव सावरकर यांच्यासारख्या प्रज्वलित आणि तत्वनिष्ठ विचारांच्या महनीय व्यक्तीने केली आहे. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये (Maharashtra Military School)  काम करण्याचा काळ हा माझ्या आयुष्यातील ‘गोल्डन पिरियड’ होता. आजही मला या शाळेची स्वप्ने पडतात. येथे केवळ विद्यार्थीच नाही, तर शिक्षकही घडतात, असे शाळेचे माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे म्हणाले.

IMG 20260126 101156056 HDR.jpg scaled

(हेही वाचा Maharashtra Military School च्या कणाकणात राष्ट्रभक्ती; माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी आठवणींना दिला उजाळा)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.