Maharashtra Military School च्या कणाकणात राष्ट्रभक्ती; माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी आठवणींना दिला उजाळा

109
Maharashtra Military School event with Hemant Chopde
Hemant Chopde shares memories at the Republic Day celebration.

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. ‘या शाळेच्या कणाकणात राष्ट्रभक्ती भिनलेली आहे, कारण या संस्थेची स्थापना आदरणीय विक्रमराव सावरकर यांच्यासारख्या प्रज्वलित आणि तत्वनिष्ठ विचारांच्या महनीय व्यक्तीने केली आहे,‘ असे प्रतिपादन शाळेचे माजी मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School) व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक रणजित सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुंबई विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख शिरीष अत्रे, बँक ऑफ बडोदाच्या निवृत्त अधिकारी अलका गोडबोले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे पदाधिकारी देवेंद्र गंद्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा 77th Republic Day : प्रजासत्ताक दिनाची शान राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयवादी व्हावे; अलका गोडबोले यांचे आवाहन)

वीर सावरकरांच्या विचारांचा वारसा

आपल्या भाषणात हेमंत चोपडे यांनी विक्रमराव सावरकरांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, ‘बापूंनी आयुष्यभर हिंदुत्वाचा आणि राष्ट्रवादाचा विचार कोणतीही तडजोड न करता जपला. त्यांना स्वामिनी वहिनींची खंबीर साथ लाभली. या दोघांच्या त्यागातून ही संस्था उभी राहिली आहे. आजच्या कठीण काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘शस्त्र राष्ट्रस्य बलम्’ हे सूत्र आपण लक्षात ठेवणे काळाची गरज आहे.‘

(हेही वाचा Maharashtra Military School म्हणजे सामर्थ्यवान आणि सुसंस्कृत नागरिक घडविणारे केंद्र; शिरीष अत्रे यांचे गौरवोद्गार)

यावेळी चोपडे यांनी शाळेसोबत असलेल्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये (Maharashtra Military School)  काम करण्याचा काळ हा माझ्या आयुष्यातील ‘गोल्डन पिरियड’ होता. आजही मला या शाळेची स्वप्ने पडतात. येथे केवळ विद्यार्थीच नाही, तर शिक्षकही घडतात. मी स्वतः या भूमीत घडलो याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संचलन आणि विविध कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.