Republic Day 2026 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात प्रा. स्नेहल पाठक यांच्या हस्ते ध्वजवंदन

71
ध्वजवंदन समारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात
प्रा. स्नेहल पाठक यांच्या हस्ते ध्वजवंदन.

Republic Day 2026 :      स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सोमवारी, ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या कार्याध्यक्ष प्रा. स्नेहल पाठक यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि कर्मचारी वर्ग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(Republic Day 2026)

ध्वजारोहण केल्यानंतर प्रा. स्नेहल पाठक यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी जेव्हा अंदमानला जाऊन आले, तेव्हाच ठरवलं की, मुंबईत आल्यावर आधी स्मारकाला भेट द्यायची. आणि मी नेहमीच इथे येते. ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याची संधी मला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी दिली. तिरंग्याचा सन्मान, मातृभूमीचा स्वाभिमान, मातृभूमीबद्दलची अस्मिता आणि ज्या क्रांतिवीरांनी बलिदान दिलं, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान अविस्मरणीय आहे, असे उद्गार स्नेहल पाठक यांनी काढले.(Republic Day 2026)

(हेही वाचा India-EU Trade Deal : लक्झरी कार स्वस्त होणार! करारादरम्यान मोठी घोषणा होण्याची शक्यता )

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ध्वजारोहणाची संधी मिळाल्याबाबत प्रा. पाठक म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. पण, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता मिळालेली संधी माझ्यासाठी अविस्मरणीय आणि मर्मबंधातली ठेव आहे. स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेले समर्पण आणि त्यांच्याच राष्ट्रीय स्मारकात ध्वजारोहणाची मिळालेली संधी शब्दातीत आहे, असेही त्यांनी सांगितले.(Republic Day 2026)

दरम्यान, देशातील युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारातून प्रेरण घेण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या, देशातील सद्यस्थितीला तोंड देण्यासाठी लेखणीपेक्षाही शक्ती वापरावी लागली तरी चालेल. परंतु, ती शक्ती विचारपूर्वक असावी, असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य तर मिळाले आहे, पण ते टिकविण्यासाठी तरुणांनी विज्ञाननिष्ठ, विज्ञानवादी बनावे. तसेच, सावरकरांच्या विचारांनुसार, एखादी गोष्ट करताना भावनेला कृतीची जोड देताना वैज्ञानिक विचार तरुणांनी करावा, असेही प्रा. स्नेहल पाठक यांनी सांगितले.(Republic Day 2026)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.