Bhandup Bus Accident : भांडुप स्टेशनबाहेर बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; ४ पादचाऱ्यांचा मृत्यू, १४ जखमी

354
Bhandup Bus Accident : भांडुप स्टेशनबाहेर बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; ४ पादचाऱ्यांचा मृत्यू, १४ जखमी
Bhandup Bus Accident : भांडुप स्टेशनबाहेर बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; ४ पादचाऱ्यांचा मृत्यू, १४ जखमी

भांडुप (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात घडला. यू-टर्न घेत असताना बेस्ट बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट फूटपाथवर घुसली. या अपघातात किमान चार पादचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. कुर्ला (Kurla) येथील भीषण बस अपघाताला नेमके एक वर्ष पूर्ण होत असतानाच ही धक्कादायक घटना घडल्याने मुंबईकर हादरले आहेत. (Bhandup Bus Accident)

भांडुप पश्चिम येथे मार्ग क्रमांक ६०६ वर धावणारी वेट-लीज इलेक्ट्रिक एसी बस (Wet-Lease Electric AC Bus) सोमवारी रात्री सुमारे १०.०५ वाजता स्टेशन परिसरात यू-टर्न घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली. त्यानंतर बस थेट फूटपाथवर उभी असलेल्या नागरिकांवर आदळली. काही क्षणांतच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. (Bhandup Bus Accident)

(हेही वाचा – Cyber ​​Fraud : भारतामध्ये ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ; ग्रामीण भागांवर कसा होत आहे परिणाम ?)

अपघातग्रस्त बस विक्रोळी डेपोशी संलग्न असून ती वेट-लीज तत्त्वावर चालवली जात होती. कंत्राटी चालक संतोष रमेश सावंत (Santosh Ramesh Sawant) (५२) याला भांडुप पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध निष्काळजी व बेदरकार वाहनचालना प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेस्ट प्रशासनाने चालकाला तात्काळ निलंबित केले असून घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चालकाला योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. बसचे कंडक्टर भगवान घारे (४७) आहेत. (Bhandup Bus Accident)

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मानसी गुरव (४५), सायन रुग्णालयातील परिचारिका; प्रणिता रसम (३१); वर्षा सावंत (२५) आणि वाहतूक विभागात कार्यरत प्रशांत शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मानसी गुरव यांचे पती ट्रेनमधून उतरल्यानंतर म्हणाले, “ती रोज बसनेच घरी जात असे.” प्रणिता रसम यांचे पती संदीप यांनी सांगितले की, शूटिंगसाठी दादरला गेली असल्याची माहिती त्यांना शेवटपर्यंत नव्हती. घटनेवेळी प्रणितासोबत असलेली त्यांची नऊ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. (Bhandup Bus Accident)

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मानवी चूक की तांत्रिक बिघाड, याचा तपास सुरू असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Bhandup Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.