Delhi Air Pollution : पुरुष व महिलांमध्ये प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम कुणावर ?, रिसर्च काय सांगतो ?

107
Delhi Air Pollution : पुरुष व महिलांमध्ये प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम कुणावर ?, रिसर्च काय सांगतो ?

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठातल्या संशोधकांनी साल २०१९ ते साल २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीदरम्यान एक महत्त्वपूर्ण रिसर्च केला आहे. हा रिसर्च हल्लीच ‘Scientific Reports’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये असं आढळलं की, दिल्ली इथल्या पुरुषांच्या फुफ्फुसामध्ये महिलांच्या तुलनेने पीएम २.५ यांसारख्या अति सूक्ष्म प्रदूषक कणांचा प्रभाव हा बसलेल्या स्थितीमध्ये साधारणपणे १.४ पट जास्त आणि चालताना किंवा साध्या हालचाली करताना १.२ पट जास्त होतो. (Delhi Air Pollution)

(हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा अनोखा विक्रम, मिताली राजनंतर १०,००० धावा करणारी दुसरी भारतीय महिला)

महिला आणि पुरुषांच्या फुफ्फुसांमध्ये या प्रदूषकांचा प्रभावाचा फरक दिसून येण्याची प्रमुख कारणं :
  • दिल्लीमध्ये पुरुष हे महिलांच्या तुलनेने जास्त वेळ घराबाहेर असतात. त्यामागे नोकरी, व्यवसाय, दैनंदिन प्रवास आणि बाहेरची इतर कामं ही कारणं असू शकतात. त्यादरम्यान पुरुषांना सकाळी ऑफिसला जाणं, संध्याकाळी घरी परतणं, ट्रॅफिकमध्ये अडकणं किंवा रस्त्यावरुन चालणं अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.
  • दिल्लीमध्ये घराबाहेरच्या हवेमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या प्रदुषकांच्या सूक्ष्मकणांची पातळी विशेषतः रस्ते, औद्योगिक विभाग आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये खूप जास्त असते. तर दिल्लीतल्या महिलांचा बराचसा वेळ घरातच जातो. घरामध्ये बाहेरच्या वायू प्रदूषणापेक्षा कमी प्रदूषण असतं.
  • तसंच पुरुषांची फुफ्फुसे आकाराने मोठी असतात. त्यामुळे पुरुषांच्या श्वासोच्छ्वासाचा वेग हा महिलांच्या तुलनेने जास्त असतो. त्यामुळे घराबाहेरच्या प्रदूषित हवेचे जास्तीत जास्त कण पुरुषांच्या फुफ्फुसाच्या आत जमा होतात. तर महिलांचा श्वास घेण्याचा वेग जास्त असला तरी प्रत्येक श्वासातल्या हवेचं प्रमाण कमी असतं. परिणामी, एकूण प्रदूषकांचं शोषण महिलांमध्ये कमी होतं. (Delhi Air Pollution)

(हेही वाचा – Train Accident : मोठा अपघात! रेल्वेचे डबे रुळावरून घसरले; १३ जणांचा मृत्यू)

  • दिल्लीसारख्या शहरामध्ये पुरुषांचं काम बऱ्याचदा घराबाहेर असतं. अशातच संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये घरी परतताना ट्रॅफिकमध्ये अडकल्याने प्रदूषणाशी थेट संपर्क होतो.
  • रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, चालताना किंवा व्यायाम करताना महिलांच्या तुलनेने पुरुषांचा श्वास घेण्याचा वेग वाढतो. त्यामुळे प्रदूषकांचा जमाव त्यांकब्या फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात होतो. पण महिलांच्या बाबतीत घरगुती कामं जास्त असल्यामुळे त्यांचा बाहेरील प्रदूषणाशी संपर्क फारसा होत नाही. हा रिसर्च दिल्लीतल्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सच्या डेटावर आधारित आहे.
  • या रिसर्चमध्ये वास्तविक वेळेच्या प्रदूषण पातळीचा विचार केला गेला आहे. तरीही प्रदूषणाचा धोका हा महिला आणि पुरुष दोघांसाठीही घातकच ठरू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाचा शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येतील. जसं की, एन ९५ मास्क वापरणं, पीक अवर्समध्ये प्रवास करणं टाळणं, सार्वजनिक वाहतूकीचा जास्तीत जास्त वापर करणं घरात एअर प्युरिफायर लावणं आणि शक्य तितकं घराबाहेर कमी फिरणं इत्यादी. दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी समाजाने सामूहिकपणे एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून सर्वांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण तयार होईल. (Delhi Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.