Bihar Election Result 2025 : महाराष्ट्रात मदतीला आली लाडकी बहीण; बिहारमध्येही एनडीएला महिलांचाच सहारा

147

महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेने महायुतीला पुन्हा एकहाती सत्ता दिली. लाडक्या बहिणींना दरमहा दिलेल्या १५०० रुपयांनी अवघी निवडणूक फिरली. बिहारमध्येही महिलांनीच एनडीए (NDA) सरकारला सहारा दिल्याचे उघड झाले आहे. (Bihar Election Result 2025 )

(हेही वाचा – IPL Trade : नवीन हंगामातील आयपीएलचा पहिला अधिकृत व्यवहार, शार्दूल ठाकूर मुंबईकडे)

बिहारमध्ये सुमारे १.५ कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय १०००० रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (CMWES) अंतर्गत देण्यात आली. महिलांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी आणि लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, सुमारे १.५ कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय १०००० रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याच योजनेचे पडसाद निकालामध्ये दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं सत्ता राखण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. बिहारमधील महिलांना ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ही योजना २९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने तिचे उद्घाटन केले. डिसेंबर २०२५ पर्यंत शक्य तितक्या पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

बिहारमध्ये महिलांसाठी कोणत्या सरकारी योजना ?
  • मुख्यमंत्री महिला रोजगार योजना: महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत प्रदान करते.
  • जीविका स्वयं-सहायता गटांद्वारे महिला सक्षमीकरण.
  • पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षण
  • महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या यशासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंग सहाय्य प्रदान करणे.
महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लोकप्रिय

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत (CMWES) निवडणुकीपूर्वी ७५ लाख महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे या योजनेची व्यापक पोहोच आणि परिणाम दिसून येतो. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा १० ऑक्टोबरला करण्यात आली. त्यापूर्वी नितीश सरकार (Nitish Kumar) महिलांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातही लोकसभेत चांगलीच पिछाडी घेणाऱ्या महायुती सरकारने विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले, त्याला लाडकी बहीण योजनाच कारणीभूत आहे. (ladaki bahin yojana) राजकीय नेत्यांनीही लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेत बसवले, हे मान्य केले आहे. (Bihar Election Result 2025 )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.