सरकारचे शटडाऊन सुरू झाल्याने अमेरिकेला नव्या अनिश्चिततेच्या चक्राचा सामना करावा लागत आहे. (U.S. Government Shutdown) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि सिनेट यांच्यातील चर्चेत सरकारचे कार्यक्रम व सेवा सुरू ठेवण्यासाठी कोणताही करार न झाल्याने १ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) च्या डेडलाइननंतर हा परिणाम घडला.
(हेही वाचा – Nashik च्या रस्त्यांवर गुन्हेगारीचा सुळसुळाट ! भाजपा आमदारांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव…)
सुमारे ७.५ लाख फेडरल कर्मचाऱ्यांना कामावरून दूर ठेवले जाणार असून काहींना ट्रम्प प्रशासनाने कायमचे कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. अनेक सरकारी कार्यालये बंद राहतील, काही कदाचित कायमची बंद होतील. याचा आर्थिक फटका संपूर्ण देशभर बसण्याची भीती आहे.
“आम्हाला शटडाऊन नको आहे,” असे ट्रम्प यांनी मध्यरात्रीच्या डेडलाइनपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये (White House) सांगितले. परंतु डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यात कोणताही तोडगा काढण्यात ते अपयशी ठरले. हे ट्रम्प यांच्या कारकिर्दीतील तिसरे शटडाऊन (Third shutdown) आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतरचे पहिले, ज्यातून बजेटवरील प्राधान्यक्रमांबाबतचा तीव्र राजकीय संघर्ष आणि समझोत्याऐवजी कडव्या भूमिकांना मिळणारे प्राधान्य अधोरेखित होते.
या वेळी शटडाऊनची लढाई डेमोक्रॅट्सनी छेडली, जे सरकार सुरळीत चालू ठेवण्याच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. परंतु त्यांच्या मतदारांना ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील अजेंड्याला आव्हान द्यायचे आहे. डेमोक्रॅट्सनी आरोग्य विमा सबसिडींसाठी निधीची मागणी केली आहे, जी ‘अफॉर्डेबल केअर ॲक्ट’ अंतर्गत लाखो लोकांसाठी संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे प्रीमियम दर झपाट्याने वाढत आहेत. रिपब्लिकन पक्षाने चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला असून ट्रम्प यांनीही दूर राहावे, असा सल्ला दिला आहे.
सध्या कोणत्याही पक्षाकडे या दीर्घकाळ टिकू शकणाऱ्या शटडाऊनमधून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग नाही. या संकटाचे परिणाम केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सरकारी लाभ, कंत्राटी कामे आणि विविध सेवांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहेत. (U.S. Government Shutdown)
हेही पहा –


