Nashik च्या रस्त्यांवर गुन्हेगारीचा सुळसुळाट ! भाजपा आमदारांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव…

154
BMC Election : उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावं; भाजपाचं खुलं आव्हान
BMC Election : उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावं; भाजपाचं खुलं आव्हान
  • प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहर गुन्ह्यांच्या छायेत जगत आहे. टोळ्यांमधील हाणामाऱ्या, गँगवार, चैन स्नॅचिंग आणि खूनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर व्यापारी वर्गात संताप उसळला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहराची कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची चर्चा सुरू आहे.

(हेही वाचा – Anil Deshmukh यांच्यावरील ‘तो’ हल्ला की राजकीय डाव ? पोलिसांचा अहवाल चर्चेत…)

नाशिकसारख्या (Nashik) महत्त्वाच्या शहरात रोजच्या रोज गुन्हेगारी वाढत असल्याने याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर, उद्योगधंद्यावर आणि पर्यटनावर होत असल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिक पातळीवर अनेकदा गुन्ह्यांविरोधात आक्रोश झाला, पण अपेक्षित पावलं उचलली गेली नाहीत. परिणामी संतापलेल्या जनतेचा दबाव आता थेट राजकीय वर्तुळात जाणवू लागला आहे.

(हेही वाचा – Maha Navami 2025 : खंडेनवमीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार शस्त्रपूजन)

या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपाचे तिन्ही आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी सरळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. नाशिकमध्ये (Nashik) वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. हत्या, चैन स्नॅचिंग आणि टोळी युद्धासारख्या घटनांनी शहर अस्वस्थ झालं असून, पोलिस यंत्रणेला अधिक सजग करण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, आणि नाशिककरांना गुन्हेगारीच्या सावटातून मुक्ती मिळते का, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.