
-
प्रतिनिधी
मुंबईत २००६ मध्ये झालेल्या ७/११ साखळी बॉम्बस्फोटातील तपास यंत्रणेतील सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) विनोद भट यांचा मृतदेह दादर माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान आढळून आला होता. प्राथमिक तपासात भट यांनी आत्महत्या केल्याचे निष्कर्ष काढण्यात आले होते, या घटनेला जवळजवळ १९ वर्षे उलटले परंतु अद्यापही भट यांच्या आत्महत्येचे नेमके कारणअद्यापही स्पष्ट झालेले नाही. एसीपी विनोद भट हे दादर कीर्ती महाविद्यालय परिसरात राहण्यास होते. ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये विविध स्थानकांवर दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक असे ६ बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असताना भट हे दहशतवाद विरोधी पथकात एसीपी होते. त्यांना या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात सहभागी करून घेण्यात आले होते. तपास सुरू असताना २९ ऑगस्ट २००६ रोजी एसीपी विनोद भट यांचा मृतदेह दादर माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान आढळून आला होता. (2006 Mumbai Train Bomb Blast)
(हेही वाचा – Sewage Treatment Plant मधून बाहेर पडणाऱ्या बायोगॅसपासून होणार वीजनिर्मिती)
त्यावेळी दादर रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती, परंतु एसीपी दर्जाचा अधिकारी ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन असताना ते रेल्वेने प्रवास का करतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. भट यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात तसेच एटीएसमध्ये खळबळ उडवून दिली होती. भट यांच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना असे समोर आले की, घटनेच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, भट यांनी त्यांच्या सरकारी वाहनाच्या चालकाला दादरमधील टिळक पुलावर सोडण्यास सांगितले. गाडीतून उतरण्यापूर्वी त्यांनी त्यांचे ओळखपत्र वगळता सर्व वैयक्तिक सामान त्यांच्या चालकाकडे सोपवले आणि ते त्यांच्या पत्नीला देण्यास सांगितले. यावरून असे स्पष्ट झाले की, त्यांनी आत्महत्या केली. परंतु आत्महत्येचे पाऊल उचलण्या एवढे त्यांच्या जीवनात कुठले वादळ निर्माण झाले होते, त्यांनी एवढे कठोर पाऊल का उचलेले याबाबत अनेक तर्क वितर्क काढण्यात आले परंतु नेमके कारण कधीच समोर आले नाही. (2006 Mumbai Train Bomb Blast)
(हेही वाचा – आधार कार्ड, रेशन कार्ड पुरावा म्हणून वापरता येऊ शकतात का; काय म्हणाले Election Commission सर्वोच्च न्यायालयात?)
विनोद भट हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते, ते एक प्रामाणिक अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांचे सहकारी खूप मान देत असत. या पोलिस अधिकाऱ्याच्या गूढ मृत्यूचा उल्लेख २०१५ मध्ये ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केलेल्या एका आरोपीने लिहिलेल्या पुस्तकात आढळला होता.ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेल्या अब्दुल वाहिद शेख याने त्यांच्या ‘बेगुनाह कैदी’ या पुस्तकात दावा केला आहे की भट यांना पुरावे तयार करण्यास आणि आरोपींविरुद्ध खोटे साक्षीदार तयार करण्यास भाग पाडल्याची कबुली दिली होती. १९ वर्षांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने ७/११ बॉम्बस्फोटाचा निकाल जाहीर करून सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली असली तरी या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पथकातील अधिकारी विनोद भट यांच्या आत्महत्येचे कारण १९ वर्षांनी देखील समोर आलेले नाही. (2006 Mumbai Train Bomb Blast)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
