इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत (Edgbaston Test 2025) कर्णधार शुभमन गिलची (Captain Shubman Gill) चांगली कामगिरी दिसून आली आहे. भारताच्या पहिल्या डावात शुभमन गिलने द्विशतक झळकावले असून, शुभमनने ३११ चेंडूत द्विशतक पूर्ण केले आहे. ज्यामध्ये २१ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शुभमनच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले द्विशतक देखील होते. (Shubman Gill Double Century)
(हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने एलन मस्क यांची टेस्ला कार संकटात; चीनच्या Xiaomi EV ला मोठी मागणी)
SENA देशात ‘द्विशतक’ झळकवणारा ठरला पहिला आशियाई कर्णधार
या द्विशतकी खेळीसह शुबमन गिलनं टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा विक्रम मागे टाकला आहे. शुबमन गिल हा सेना देशांत द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. १९९० मध्ये ऑकलंडच्या मैदानात भारतीय संघाचे नेतृत्व करताना अझरुद्दीन याने १९२ धावांची खेळी केली होती. ही SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. आता शुबमन गिल टीम इंडियाचा नंबर वन कर्णधार ठरला आहे. एवढेच नाहीतर सेना देशांत द्विशतकी खेळी करणारा तो आशियाई देशांतील पहिला कर्णधारही ठरलाय.
विक्रमी खेळीसह शुबमन गिलनं मारली द्रविड गावसकरांच्या क्लबमध्ये एन्ट्री
इंग्लंडच्या मैदानात द्विशतकी खेळी करणारा शुबमन गिल हा तिसरा भारतीय फलंदाज आहे. १९७९ मध्ये ओवलच्या मैदानात लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी २२१ धावांची खेळी केली होती. ओवलच्या मैदानातच २००२ च्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडच्या भात्यातून २१७ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. या दिग्गजांच्या यादीत आता गिलनं एन्ट्री मारली आहे. एवढेच नाही गावसकरांना मागे टाकत इंग्लंडच्या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.
(हेही वाचा – ISKCON Temple : अमेरिकेतील मंदिरावर अज्ञातांकडून गोळीबार; सुरक्षा व न्यायाची हिंदू संघटनांची मागणी)


