Sanjay Raut आता इराणमध्येही लोकप्रिय; इराणच्या कॉन्सुल जनरल मोहसेनी फर्ड यांचा दावा

Sanjay Raut यांनी इराणच्या वाणिज्य दूतावासाला दिली भेट; इस्रायलच्या गाझामधील कारवाईवर केली टीका.

260

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला नेहमीच धक्का देणारे आणि रोज सकाळी जनतेची दिशाभूल करणारे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत! इराणचे कॉन्सुल जनरल (Consul General of Iran) मोहसेनी फर्ड (Mohseni Fard) यांनी नुकताच एक दावा केला आहे की, संजय राऊत हे इराणमधील (Iran) ‘सर्वाधिक लोकप्रिय नेते’ (Most Popular Leader) आहेत. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(हेही वाचा – Bihar Assembly Election : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा)

Sanjay Raut यांनी दिली वाणिज्य दूतावासाला भेट

संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत इस्रायल (Israel) आणि अमेरिकेच्या (US) आक्रमकतेविरोधात इराणला (Iran) पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे आता ते इराणमध्ये इतके लोकप्रिय झाले आहेत. ३ जुलै या दिवशी संजय राऊत यांनी (Sanjay Raut) इराणच्या वाणिज्य दूतावासाला (Iran Consulate) भेट दिली. आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या दूतावासाला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले आणि केवळ इराण असल्यामुळेच आपण आलो, असे स्पष्ट केले. या संजय राऊत यांच्यासह ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे (All India Shia Personal Law Board) सरचिटणीस मौलाना यासूद अब्बास (Maulana Yasoub Abbas), हम भारत के लोगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज मिठीबोरवाला (Feroze Mithiborwala), ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र धुम्रे (Narendra Dhumbre), अलाउद्दीन शेख (Alauddin Sheikh) आणि नुरुद्दीन नाईक (Nuruddin Naik) यांचा समावेश होता.

कॉन्सुल जनरल मोहसेनी फर्ड (Mohseni Fard) यांच्या या विधानानंतर, अनेकांना प्रश्न पडला आहे की संजय राऊत (Sanjay Raut) इराणमध्ये इतके लोकप्रिय कसे झाले? त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ सदरातील लेख इराणी भाषेत अनुवादित होऊन तिथे वाचले जातात का, किंवा त्यांचे पत्रकार परिषदेतील आवेशपूर्ण भाषणे तिथे थेट प्रक्षेपित होतात का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कदाचित इराणच्या राजकारणाला ही एका ‘धारदार’ आणि ‘बिनधास्त’ नेत्याची गरज असावी, आणि म्हणूनच त्यांना राऊत यांच्यात आपले भविष्य दिसत असावे, अशी उपरोधिक चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. आता राऊत हे महाराष्ट्रात कमी आणि इराणमध्ये जास्त वेळ देतील का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

Sanjay Raut यांचे आतंकवाद्यांना समर्थन

या वेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या भेटीच्या वेळी गाझामध्ये (Gaza) इस्रायल करत असलेल्या कारवाईवर टीका केली. या काळात इस्रायलशी संबंध ठेवल्याने संबंधित देश वेगळे पडत आहेत, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात इस्रायलने हमासच्या आतंकवादाच्या विरोधात सुरु केलेल्या या लढ्यात भारताने इस्रायलला समर्थन दिले आहे. असे असूनही संजय राऊत हमासच्या आतंकवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि इस्रायलमधील अनेक निरपराध्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या गाझाचे समर्थन करत आहेत. त्यामुळेच इराणमध्येही त्यांची लोकप्रियता वाढत आहे, अशी चर्चा सुरु आहे. या विषयावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही; पण सत्ताधाऱ्यांसाठी हा एक टीकेचा विषय बनला आहे. (Sanjay Raut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.