BMC : मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना ‘या’ संकेतस्थळावर मिळणार फॉर्म-१६

531
BMC Election : बीएमसी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी शरद पवार आग्रही
BMC Election : बीएमसी निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी शरद पवार आग्रही
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारक यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ चे आयकरविषयक ‘प्रपत्र-१६’ (फॉर्म-१६) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारकांनी सदर प्रपत्र https://form16.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावे, असे आवाहन  महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी कर्मचारी तथा निवृत्तीवेतन धारकांना ‘प्रपत्र-१६’ (फॉर्म-१६) उपलब्ध केले जाते. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे ‘प्रपत्र-१६’ डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही ब्राऊझरच्या साहाय्याने https://form16.mcgm.gov.in या संकेतस्थळावर लॉग-इन करता येऊ शकते. कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन धारकांनी या संकेतस्थळावर लॉग-इन केल्यानंतर दिलेल्या चौकोनामध्ये सात अंकी कर्मचारी संकेतांक (Employee Code) नमूद करावा. त्याखालील चौकोनामध्ये ‘पॅन’ क्रमांकाची अचूक नोंद करावी.  कर्मचारी संकेतांक आणि पॅन क्रमांकाची नोंद केल्यावर पटलावर (स्क्रिन) दिसणारा ‘कॅप्चा कोड’ (captcha code) दिलेल्या चौकोनामध्ये अचूक नोंदवावा आणि नंतर ‘कन्फर्म’ (confirm) वर क्लिक करावे. त्यानंतर पटलावर संबंधित कर्मचाऱ्याचे ‘प्रपत्र-१६’ दिसेल. ‘डाऊनलोड’वर क्लिक करुन सदर प्रपत्र प्राप्त करता येईल. (BMC)
‘प्रपत्र-१६’ (फॉर्म-१६) हे ‘अ’ आणि ‘ब’ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. ‘भाग अ’ (PART A) हा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे. तर, ‘भाग ब’ (PART B) मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील उत्पन्न, गुंतवणूक व त्यावरील आयकर यांचा तपशील आहे. ‘भाग अ’ (PART A) मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, ‘भाग ब’ (PART B) मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रक्कमेतून वजा करून योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी. तसेच, वेळेत आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) आयकर खात्याला सादर करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (BMC)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.