Accident : गोवंडीत बाईकवर स्वार चार जणांचा डंपरच्या धडकेत मृत्यू; नागरिक संतप्त

246
Accident : गोवंडीत बाईकवर स्वार चार जणांचा डंपरच्या धडकेत मृत्यू; नागरिक संतप्त
  • प्रतिनिधी 

गोवंडी शिवाजी नगर, लोटस जंक्शन येथे भरधाव वेगात असलेल्या डंपरने एका मोटार सायकलला दिलेल्या धडकेत मोटार सायकलवर असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी घाटकोपर मानखुर्द रोडवर ठिय्या आंदोलन केल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. या अपघातात मृत्यू झालेले चौघे काका पुतणे असून साकिनाका परिसरात राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Accident)

(हेही वाचा – Vikhroli Bridge वाहतुकीसाठी अखेर खुला; आता बिनधास्त करा प्रवास)

नूर मोहम्मद गलेन (४२), आर्यन गलेन (११), मोहम्मद हुसेन खान (११) आणि अब्दुल गनी खान (९) असे डंपरच्या धडकेत ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. नूर आणि आर्यन पितापुत्र असून इतर दोघे नूरचे पुतणे आहे. हे चौघे साकिनाका येथे राहण्यास आहे. शनिवारी दुपारी नूर हा मुलगा आणि दोन पुतण्यांना घेऊन मोटारसायकलवरून देवनार येथे निघाले होते. मोटर सायकलवर दोन जनच बसू शकतात, पण या ठिकाणी चार जण बसले होते.  दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटस जंक्शन गोवंडी येथे भरधाव वेगात असलेल्या डंपरने नूरच्या मोटार सायकलला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, मोटार सायकलवरील चौघे जण काही फुटावर जाऊन पडून गंभीररीत्या जखमी झाले. या अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच देवणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी चौघांनाही तपासून मृत घोषित केले. (Accident)

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash नंतर एअर इंडियाने 171 क्रमांक केला रद्दबातल)

या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी तेथून जात नसल्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागविण्यात आली. आंदोलन चिघळत असल्याचे बघून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न केला असता आंदोलकांनी घोषणाबाजी सुरु केली. अखेर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करुन आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान अपघाताप्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली. (Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.