Operation Sindoor यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

340
DCM Ajit Pawar यांच्या ‘रणनीतीकारा’वर पुण्यात पोलीस छापा; नेमकं प्रकरण काय?
  • प्रतिनिधी

पहलगाम येथील अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजनबद्ध हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) यशस्वीरीत्या पार पाडले. या कारवाईचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जल्लोषात स्वागत करत भारतीय सैन्यदलांचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

अजित पवार यांनी म्हटले की, “भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर संपूर्ण देशाला विश्वास आहे आणि या क्षमतेच्या पाठिशी आज देशाची एकजूट उभी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ने केवळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर भारताची राजकीय इच्छाशक्ती आणि लष्करी सामर्थ्यही सिद्ध केले.”

(हेही वाचा – Operation Sindoor : मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं ! पहलगाम हल्ल्याला भारताचे चोख उत्तर)

या कारवाईमुळे 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या 26 निष्पाप पर्यटकांचा सूड घेण्यात आला असून, जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा यांच्या दहशतवादी अड्ड्यांवर थेट प्रहार करण्यात आले आहेत. या ठिकाणी नौदल, वायूदल आणि थलसेनेच्या समन्वयातून मोठी कारवाई पार पडली.

राजकीय इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना पवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या स्पष्ट नेतृत्वामुळेच सैन्याला मोकळीक मिळाली आणि कारवाई यशस्वी झाली. हा केवळ सुरुवात आहे. दहशतवाद समूळ नष्ट होईपर्यंत भारत अशाच पद्धतीने प्रत्युत्तर देत राहील.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.