App : सावधान! App अपडेट करताना सांभाळा, अन्यथा…

100

हल्लीच्या काळात जितक्या सोयी सुविधा जास्त आहेत तितकेच त्यांचे धोकेही दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आपल्या मोबाईलमध्ये कित्येक सुविधा असल्यामुळे आपले काम बरेचसे सोपे होते. त्यांपैकीच एक सुविधा आहे ती म्हणजे मोबाईल बँकिंग. हल्ली मोबाईल बँकिंगचा उपयोग जास्त प्रमाणात होत आहे.

मोबाईल बँकिंग करत असल्याने आपल्याकडे फारशी रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते. त्यामुळे चोरांचा धोका टाळता येतो. पण सायबर क्राईम करणाऱ्यांचं काय? त्यांना आपण कसं थांबवू शकतो? हे सायबर क्राईम करणारे हॅकर्स दर वेळेस नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करून त्यांचे बँक बॅलन्स रिकामे करतात.

हल्लीच मिळालेल्या रिपोर्टनुसार पोलिश फायनान्शियल सुपरव्हीजन अथॉरीटीच्या कंप्युटर सिक्युरिटी इनसिडेन्स रिस्पॉन्सच्या सिक्युरिटी रिसर्चर्सनी एक नवीन मुद्दा शोधून काढला आहे. हॅकर्सनी मोबाईल बँकिंग करणाऱ्या लोकांना फसवण्याची नवीन शक्कल शोधून काढली आहे.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

या ट्रिकमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमचे बँकिंग ऍप अपडेट करण्यासाठी एक टेक्स्ट मेसेज पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये एक लिंकही पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक अपडेट दिसेल. तिथे तुम्हाला webAPK डाऊनलोड करायला सांगते. हे अपडेट केले म्हणजे तुम्ही त्यांना तुमचा फोन हॅक करायला दिली असा अर्थ होतो. हे अपडेट गूगल किंवा प्ले स्टोअरशी संबंधित नसते. हे डाऊनलोड करताच तुमचा स्मार्टफोन सिक्युरिटी डिसेबल करतो. मग तुम्हाला एक खोटा फॉर्म दाखवून तुमच्या बँकेचे डिटेल्स भरायला सांगितले जाते. ते डिटेल्स भरताच तुमच्या बँक अकाऊंट आणि ट्रांजेक्शनची सगळी माहिती त्या हॅकर्स कडे पोहोचलेली असते. अशाप्रकारे ते तुमचा बँक अकाऊंट रिकामा करू शकतात. अशाप्रकारच्या कुठल्याही फसवणुकीला तुम्ही बळी न पडण्यासाठी या प्रकारची कोणतीही संशयास्पद लिंक किंवा मेसेज आला तर तो नंबर ब्लॉक करा. तुम्ही त्या नंबरची तक्रारही दाखल करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.