Israel Palestine Conflict : पुरवठा थांबल्यास हजारो रुग्णांचा मृत्यू अटळ, इस्रायल येथील डॉक्टरांचा इशारा

‘गाझा’तील रुग्णालयांचा इशारा

85
Israel Palestine Conflict : पुरवठा थांबल्यास हजारो रुग्णांचा मृत्यू अटळ, इस्रायल येथील डॉक्टरांचा इशारा
Israel Palestine Conflict : पुरवठा थांबल्यास हजारो रुग्णांचा मृत्यू अटळ, इस्रायल येथील डॉक्टरांचा इशारा

इस्रायलच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या रुग्णांना गाझा पट्टीतील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांची संख्या मोठी आहे. मात्र, इस्रायली लष्कराने येथे जमिनीवरून आक्रमण करून रसद तोडल्यास रुग्णालयातील वीज, इंधन, वैद्याकीय साहित्य, मूलभूत गरजांचा पुरवठा ठप्प होण्याची भीती आहे. तसे झाल्यास रुग्णालयातील हजारो जखमी रुग्ण मृत्युमुखी पडतील, असा इशारा गाझामधील रुग्णालयांतील डॉक्टरांनी संभाव्य इस्रायली लष्करी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिला. (Israel Palestine Conflict)

इस्रायली हल्ल्यापूर्वी येथील नागरिक अन्न, पाणी आणि सुरक्षित ठिकाणे शोधण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या आठवड्यात हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलने संपूर्ण गाझा परिसराला वेढा घातला आणि पॅलेस्टिनींना उत्तरेकडील भाग सोडून दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. त्यावर ४० किलोमीटरच्या या किनारपट्टीला इस्रायलने वेढा घालून संपूर्ण नाकेबंदी केली असताना येथून अल्पावधीत नागरिक स्थलांतर करू लागले तर गंभीर संकट निर्माण होईल,’’ असा इशारा संयुक्त राष्ट्रे आणि बचाव पथकांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे, की या रुग्णालयातील दोन हजारांहून अधिक रुग्णांना तेथून हलवणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरेल. या रुग्णालयांत नवजात अर्भकेही दाखल आहेत. गाझा पट्टीतील उत्तरेकडील रुग्णालयांत अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाझा येथील रुग्णालयांतील विद्याुत जनित्रांचे इंधन दोन दिवसांत संपेल. त्यानंतर येथील हजारो रुग्णांचा जीव धोक्यात येईल. खान युनिसमधील नासिर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग जखमी-अत्यवस्थ रुग्णांनी भरलेला आहे. यात बहुतेक तीन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत.

‘क्रिटिकल केअर कॉम्प्लेक्स’चे सल्लागार डॉ. मोहम्मद कंदील यांनी सांगितले, की या हल्ल्यांतील स्फोटात गंभीर जखमी झालेले शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. या रुग्णालयांतील इंधन सोमवारपर्यंत संपेल, अशी भीती आहे. ते म्हणाले की, आयसीयूमध्ये ३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आणखी ६० रुग्ण ‘डायलिसिस’वर आहेत. जर इंधन संपले तर ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प होईल, सर्व सेवा बंद पडतील.

(हेही वाचा : Mhada : म्हाडा कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची आता मुदत वाढवली , जाणुन घ्या कधीपर्यंत स्वीकारणार अर्ज)

इस्रायलहून आणखी ४७१ भारतीय परतले
तेल अवीवमधून एकूण ४७१ भारतीयांना घेऊन दोन विमाने रविवारी सकाळी दिल्लीत परतली. चार विमानांद्वारे ‘ऑपरेशन अजय’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमधून भारतात परतू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने ही मोहीम सुरू केली आहे. १९७ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले. २७४ प्रवाशांना घेऊन चौथे विमानही दिल्लीला पोहोचले.

आणीबाणी सरकारची पहिली बैठक
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी नव्याने स्थापन झालेल्या आणीबाणी सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक रविवारी बोलाविली होती. यामध्ये हमासचा संपूर्ण नायनाट करण्यास कटिबद्ध असल्याचे नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र तेल अविव येथील लष्करी मुख्यालयात झालेल्या या बैठकीचा मुख्य उद्देश हा युद्धकाळात संपूर्ण देश एकजूट असल्याचा संदेश देण्याचा होता.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.