उबाठा गटाचा उमेदवार पडल्यावर पेढे वाटणार ; मनसे नेते Avinash jadhav

जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे, असे जाधव म्हणाले.

188
उबाठा गटाचा उमेदवार पडल्यावर पेढे वाटणार; मनसे नेते Avinash jadhav

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त मेळावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्याकडे पाहत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. दरम्यान शुक्रवारी नारायण राणे (Narayan Rane) यांनी रत्नागिरीमध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज भरला. यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinadh Jadhav) उपस्थित होते. या वेळी जाधवांनी उबाठा गट संपावा, असे आमचे स्वप्न आहे. जिथे-जिथे उबाठा गटाचे उमेदवार पडतील, तिथे मनसे पेढे वाटणार, अशी जहरी टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली. (Avinash jadhav)

(हेही वाचा – PM Narendra Modi : कॉंग्रेसची नेहमी विकासविरोधी भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र)

राणेंसाठी आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील 

किती वर्षे जुन्या आठवणीत जगायचं ? ज्या काही गोष्टी झाल्या आहेत, त्या विसरून पुढे जायचे आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे यंदाच्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीमध्ये (Ratangiri – Sindhudurga Lok Sabha election 2024) नारायण राणेंचा विजय निश्चित आहे, यासाठी आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून राणेंसाठी काम करतील, असा विश्वास मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सभेतून बोलताना व्यक्त केला. (Avinash jadhav)

(हेही वाचा  – Milind Deora : वर्षा गायकवाड दलित असल्याने त्यांना तिकीट देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध )

सुनील तटकरे यांचे काम वैभव खेडेकर करणार

आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. खेड-दापोलीत काही लोकांचा मतप्रवाह वेगळा होता. रायगडमध्ये सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे काम वैभव खेडेकर करणार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले. राणे यांनी आश्वासन दिले आहे की, जे काही गुन्हे दाखल झाले आहेत, ते पाठी घेण्याचे आश्वासन मिळाले आहे. महाराष्ट्र सैनिकांचा विचार करूनच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. पक्षादेशावर जगणारी आम्ही माणसे आहोत, असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. (Avinash jadhav)

अविनाश जाधव पुढे म्हणाले की, भास्कर जाधव (UBT Bhaskar Jadhav) काय बडबडतात ते त्यांचे त्यांना तरी कळते का, तुमच्या नादाला आम्ही लागत नाही, त्यामुळे आमच्या वाटेला जाऊ नका.

दरम्यान, रत्नागिरी येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची शिर्के सभागृहात सभा पार पडली. या वेळी आणि मनसेचे नेते अविनाश जाधव व वैभव खेडेकर यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Avinash jadhav)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.