Gold Silver Price Today 16 June 2026: सोन्या-चांदीचे भाव वधारले, तुमच्या शहरात 10 ग्रॅमचा भाव काय?

मगील दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ

148
Gold Silver Price Hike

Gold Silver Price Today 16 June 2026: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यांचा परिणाम सराफा बाजारावर होत असतो. मंगळवार, 16 जून 2026 रोजी देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आली नसली, तरी मगील दोन दिवसांत दराचा आलेख हा चढता राहिला आहे. तथापि, लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी टिकून आहे.

सोन्याचे दर प्रत्येक शहरात जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि स्थानिक करांमुळे किंचित बदलू शकतात. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील अद्ययावत भाव तपासणे आवश्यक आहे.

दोन दिवसांत किती वाढ?

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2,460 रुपयांची वाढ झाली आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 2,260 रुपयांनी वधारला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 12 आणि 13 जूनदरम्यानही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. त्या कालावधीत 24 कॅरेट सोने सुमारे 3,440 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 3,150 रुपयांनी महागले होते.

16 जून रोजी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांचा किरकोळ बदल नोंदविण्यात आला. 22 कॅरेट सोन्याचाही भाव जवळपास त्याच प्रमाणात बदलला. मात्र, मागील काही दिवसांचा एकूण विचार करता सोन्याने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिल्याचे दिसून येते.

हेही वाचा: Panchang 16 June 2026 : आजचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राशीभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

शहरानुसार सोन्याचे आजचे दर काय?

दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,51,690, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,39,060 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,810 आहे.

मुंबई: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,51,540, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,38,910 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,660 आहे.

कोलकाता: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,51,540, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,38,910 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,660 आहे.

चेन्नई: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,53,500, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,40,710 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,18,010 आहे.

बंगळुरू: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,51,540, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,38,910 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,660 आहे.

हैदराबाद: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,51,540, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,38,910 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,660 आहे.

अहमदाबाद: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,51,590, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,38,960 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,13,710 आहे.

हेही वाचा: CNG Price Hike : वाहन चालकांना झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

चांदीचीही झळाळी वाढली

सोन्यासोबतच चांदीच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सलग दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर चांदीने पुन्हा वेग पकडला असून, प्रति किलो दरात 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील दोन दिवसांचा विचार करता चांदीच्या किमती तब्बल 5,100 रुपयांनी वाढल्या आहेत. यापूर्वी 12 जून रोजी एका दिवसातच चांदीच्या दरात सुमारे 10 हजार रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

ताज्या दरांनुसार, दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो सुमारे 2.65 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही जवळपास समान दर आहेत. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर 2.80 लाख रुपयांच्या पुढे गेल्याने देशातील प्रमुख महानगरांमध्ये तेथे चांदी सर्वाधिक महाग असल्याचे दिसून येते.

बाजारातील अनिश्चितता वाढल्यास सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्यामुळे जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीनुसार सोन्याच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अद्यापही महत्त्वाचा पर्याय मानला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.